मौल्यवान दागिण्यासह विसरलेली पर्स, वाहतूक नियंत्रक गुरुपवार यानी केली परत

27

🔸प्रामाणिकपणाचे सर्वत्र होत आहे कौतूक

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

परभणी(दि.23फेब्रुवारी):- येथील महिलेची बिलोली बस स्थानकात दहा हजार किमंतीच्या मौल्यवान दागिण्यासह विसरलेली पर्स वाहतूक नियंत्रक एच.एम. गुरूपवार यानी संबधीत नातेवाईकानां परत केली. यांच्या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.नुकताच विवाह झालेल्या व परभणी येथील सौ.जयश्री सिद्धांत वाघमारे ह्या बिलोली तालूक्यातील मौ.आरळी येथे माहेरी जाण्यासाठी भाऊ जगदीश बालाजी नरहरे यांच्या सोबत बिलोली बस स्थानकात दुपारी १.०० वाजताची आरळी कडे जाणाऱ्या कारेगाव बसची प्रतिक्षा करित होत्या शुक्रवार (ता.१९) रोजी कारेगाव बस येताच घाई – घाईने बस मध्ये चढल्या व आरळी येथे पोहचताच पर्स हरवल्याचे लक्षात आले.

तेंव्हा जयश्रीचे पिता तथा दै.सकाळचे बातमीदार नरहरे बालाजी यांनी बिलोली बस आगार कर्मचारी यांच्या कडे विचारणा करित असतानाच बिलोली बस स्थानकात कर्तव्य बजावत असणारे वाहतूक नियंत्रक ( चालक) .एच.एम. गुरूपवार सदरिल पर्स विसरल्याचे लक्षात येताच ती ताब्यात घेतली व त्यात काही संपर्क क्रं असेल म्हणून पर्स उघडताच त्यात दहा हजार रुपये किंमतीचे मणी-मंगळसुत्र आणि काही रोख रक्कम (५००/₹) तसेच वडिल दै.सकाळचे बातमीदार नरहरे बालाजी यांचा फोटो आढळून येताच पेपर विक्रेता सायलू नरोड यांच्या कडून मोबाईल क्रं.घेऊन सदरील पर्स बिलोली नियंत्रण कक्षात असल्याचे सांगण्यात आले.

तेंव्हा जयश्रीचे बंधू जगदीश व वडिल बालाजी नरहरे यानां रोख रक्कम व मौल्यवान दागिण्यासह सदरिल पर्स
परत करून आजून हि प्रामाणिक माणस शिल्लक असल्याचे दाखवून दिले.या वेळी बिलोली बस आगार चे वाहतूक निरिक्षक ओमप्रकाश इंगोले, वाहतूक नियंत्रक. एल.एस. माधवाड, वाहक कैलास पांचाळ, रोखपाल आर.एस.चिलकेवार, आर.व्हि.सुरनरे,
दै.सकाळचे अंक वितरक सायलू नरोड यांनी उल्लेखनिय सहकार्य केले.विशेष म्हणजे ज्यानी पर्स परत केली त्यांचा येत्या रविवारी (ता.२८) रोजी एच.एस.गुरूपवार
यांची सेवा समाप्ती निरोप समारंभ असतानाही शेवटच्या काळापर्यंत आपल्या सेवेत कौतूकास्पद कार्य केल्याची चर्चा होत आहे.