उद्योजक व दैनिक महाभारत मुख्य सपांदक श्री विजयकुमार वाव्हळ ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड ने सन्मानित

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.23फेब्रुवारी):-मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील गेवराईचे नामांकित उद्योजक व दैनिक महाभारत मुख्य सपांदक श्री विजयकुमार वाव्हळ यांना प्रोजेक्ट100 संस्था दिल्ली व मानिनी फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे यशस्वी उद्योजक म्हणुन ‘ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड’ माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर माहिती अशी की, प्रोजेक्ट100 संस्था दिल्ली आणि मानिनी फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या व्यक्तींना ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.नवीमुंबई येथील हॉटेल योगी मिडटाऊन येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अशा व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

त्यावेळी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील नामांकित उद्योजक विजयकुमार वाव्हळ यांना त्यांच्या अनेक वर्षांपासून चालु असलेल्या भारत गॅस एजन्सी द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून धूरमुक्त भारत करण्यासाठी केंद्रसरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातुन गोरगरीब अनुसूचित जाती, आदिवासी समुदायातील कुंटुबांना घरगुती गॅस कनेक्शन देऊन एक उचांक गाठला.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गरीब, आर्थिक दुर्बल घटक, बहुजन, आदिवासी, वनक्षेत्रातील कुटुंबांना कनेक्शन देऊन सक्षमपणे योजना राबवल्याबद्दल व अनेक उद्योगात म्हणजेच ऑईल मिल, कापुस जिनिंग व वृत्तपत्र या क्षेत्रामध्ये यशस्वीरित्या कार्य केल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘ग्लोबल चेंजमेकर अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री डॉ. विजय शहा मानिनी फाउंडेशनच्या भारती चव्हाण, ऋप्रोजेक्ट100 संस्थेचे सुरज गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.