कोण म्हणते देत नाय,आमच्याच नावाचा सातबारा हातात घेतल्याशिवाय उठणार नाय”

35

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मोबा:-9975686100

म्हसवड(दि.26फेब्रुवारी):-या ठाम भूमिकेने म्हसवड परिसरातील कुळ शेतक-यांनी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोनात गेली पंधरा दिवस ठिय्या आंदोलनात तळ ठोकून जिद्दीने बसले आहेत.आमच्या हक्काच्या शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर येथील सरंमजामांची बेकायदेशीरपणे पोकळ नोंदीत ठेवावीत या मागणीसाठी डॉ़भारत पाटणकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखालील श्रमिक मुक्ती दलाचे म्हसवड परिसरातील शेतकरी बांधवांच्या आंदोलनास आज पंधरा दिवस झाले.

११ फेब्रुवारी पासुन गेली तेरा दिवस दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होते दहिवडी गावात कोरोना संसर्गाचा प्रभाव वाढल्याने कोरोना रुग्ण संख्येतही वाढ झाली यापुढे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी येथील शेतकरी बांधवांनी दहिवडी येथील आंदोलन म्हसवड येथील तलाठी कार्यालया समोर स्थलांतरीत करुन विनाखंड पंधरा दिवस सुरु ठेवले.व यापुढेही हे आंदोलन सुरु ठेवणार आहेत.
कोरोनाच्या साथीचा फैलाव होऊ नये याची काळजी घेत आंदोलनातील शेतकरी बांधवांनी प्रत्येकाच्या तोंडी मास्क व सुरक्षित अंतर ठेवीत आंदोलनात सहभागी झाले आहेत
मोठ्या संख्येने शांततेत आंदोलन करीत आहेत.

म्हसवड भागातील सुमारे ९६० शेतकरी बांधवांच्या शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर सुमारे दिडशे वर्षापासून प्रत्यक्ष कसत असलेल्या शेतक-यांची नावे कुळहक्कात आहेत व त्यांची १६ आण्याची मालकी हक्काची नोंद असताना महसुल खात्याने पुन्हा सरंमजामांची १६ आणेवारी बेकायदेशीरपणे नोंद करुन सर्व सातबारा उतारे ३२ आण्याचे केल्यामुळे या वादग्रस्त सातबारा उता-याचीं सातबारा संगणकियकरणाची कामे ठप्प झालेली आहेत.या पूर्वी वापरात असलेले हस्तलिखित पुस्तकी सातबारा उतारे वापरावर चार वर्षापुर्वीत सरकारने बंदी घातल्यामुळे येथील कुळ धारक शेतकरी अडचणीत आले आहेत.

हस्तलिखित पुस्तकी व संगणकिय हे दोन्हीही सातबारा सध्या उपलब्ध नाहीत हस्तलिखित सातबारा ऊतारे गेली चार वर्षापासुन कोणत्याही शासकीय कामकाजात वापरास पात्रच नाहीत यामुळे म्हसवड,खडकी,हिंगणी व वरकुटे- म्हसवड येथील मोठ्या संख्येने शेतकरी शासनदरबारी कागदोपत्री भूमिहिनच झाले आहेत.यामुळे शेतकरी बांधवांनी डॉ.भारत पाटणर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.
या आंदोलनास तब्बल पंधरा दिवस झाले सरकार काय भूमिका घेते याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष वेधून राहिले आहे.