लाचेची रक्कम घेताना हवलदार एसीबीच्या जाळ्या

30

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.5मार्च):- नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या व कळवण तालुका आभोना पोलीस ठाण्यात पोलीस हवलदार संशयित परसराम लक्ष्मण गांगोडे यांनी तक्रार दाराकडून पंधरा हजाराची लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

याबाबत अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आभोना पोलिसात ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदार व अन्य संशयितांना अटक टाळण्यासाठी व जामीन मिळण्याकामी मदत करण्यासाठी संशयित पोलीस हवलदार गांगोडे यांनी वीस हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती पंधरा हजाराची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गांगोडे यांना अटक केली. याबाबत अभोणा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.