शेगांव (बु) येथील समस्या मार्गी लावा-प्रहार जनशक्ती पक्ष

39

✒️विनोद उमरे(विशेष प्रतिनिधी)मो:-8766921326

शेगाव(बु)(दि.8मार्च):- वरोरा तालुक्यातील शेगांव ( बु ) येथील गांधी वार्ड नं. ५ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सोयी-सुविधा पासून दूर आहे, गांधी वार्ड नं ५ मधल्या समस्या तात्काळ मार्गी लावा व लवकरात लवकर सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी प्रहार सेवक शेरखान पठान,गीता किशोर फुलकर यांनी ग्रामपंचायत कडे केली आहे.

या समस्या मार्गी लावण्यासाठी अनेकदा निवेदने देऊन सुद्धा मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याने संबंधित वार्डात असंतोष पसरला आहे.समस्या तात्काळ निपटारा करण्यात यावे अशी मागणी करत निवेदन देण्यात आले , अन्यथा प्रहार स्टाईल ने आंदोलन करु असा इशारा देण्यात आला, यावेळी प्रहार सेवक शेरखान पठान, अक्षय बोदुगलवार ,राकेश भूतकर, ग्रा.पं.सदस्य सागर कामठी, प्रहार महिला आघाडीच्या रंजना सोनुने, सिंधु मडावी, सुनिल कापटे आदी उपस्थित होते.