प्रोफेसर डॉ.अनिल काळबांडे यांच्या कार्याची दिल्लीने घेतली दखल! भारतरत्न डॉ. आंबेडकर नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड 2021 जाहीर

34

✒️उमरखेड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

उमरखेड(दि.9मार्च):- महाराष्ट्रसह देश विदेशात नावाजलेले साहित्यिक,विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुप्रसिद्ध असलेले प्रो. डॉ. अनिल काळबांडे यांच्या साहित्यिक शैक्षणिकआणिसामाजिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांना दिल्लीचा *भारतरत्न डॉ बी आर आंबेडकर नॅशनल एक्सलंस अवॉर्ड2021* जाहीर झाला आहे.

डॉ. विशाखा स्मृती सोशल वेल्फेअर फाउंडेशन, भगवान वाल्मीकि फाउंडेशन व एम. एस. वाय फाउंडेशन, दिल्ली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर,म.फुले,राजर्षी शाहू महाराज क्रांतिसूर्य बिरसामुंडा, डॉ.आंबेडकर आण्णा भाऊ साठे यांचा वैचारीक वारसा लाभलेले प्रो.अनिल काळबांडे यांना देशपातळीवरील अवॉर्ड नुकताच जाहीर करण्यात आला आहे. हा मानाचा सन्मान प्रो.डॉ.अनिल काळबांडे यांना मागील अनेक वर्षापासून करीत असलेल्या फुलेआंबेडकर चळवळीतील मोलाचे योगदान , सामाजिक व शैक्षणिक श्रेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल मिळालाआहे.

दिनांक १५ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र सदन के.जी. मार्ग, नवी दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले , भिकू रामजी इडते (चेयरमन,भटके विमुक्त आयोग भारत सरकार), संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, मेजर जनरल दिलवरसिंग (भूतपूर्व महासंचालक N Y K S भारत सरकार), डॉ. संजीब पाल जोशी (जॉईंट सेक्रेटरी, पंचायत राज मंत्रालय भारत सरकार) आदी मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखदार सोहळ्यामध्ये हा मानाचा सन्मान प्रा. अनिल काळबांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

अभ्यासू,वक्तशीरपणा,अथककार्यमग्नता, अफाट जनसंपर्क आणि सर्वधर्मसमभावाची जाण असणारे ,कितीही अडथळे आले तरी पुरोगामी विचार राबविण्याची दुर्दम्य ईच्छाशक्ती असणारे प्रा.डॉ.अनिलकाळबांडे विद्यार्थी दशेपासुन सुरु झालेली वाटचाल अभ्यास, मेहनत, आणि पुरोगामी व विद्रोही विचारांच्या संस्कारांच्या मुशीत घडली. मराठी साहीत्याचा उत्तम व्यासंग असलेले प्रा. अनिल काळबांडे यांनी परिसरातील अनेक गरजुना लोकडाऊन चा काळात मदत केली तसेच तालुक्यातील भूमिहीनांना शेती मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी त्यांनी केले.त्यांच्या या सार्वजनिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्यामुळे यांचेवर परिसरामध्ये सर्वत्र कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.