अंजनी ग्रामपंचायत मध्ये ५० लाखाचा भ्रष्टाचार

  40

  ?बिलोली पंचायत समिती समोर उपोषणाचा पाचवा दिवस

  ✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

  बिलोली(दि.11मार्च):- तालुक्यातील मौजे अंजनी येथे ग्राम पंचायत मध्ये सन २०१५ -२०२० या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी. या मागणीसाठी निळकंठ धुन्दे पाटील.व प्रकाश पाटील. सह आठ जणानी दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी तक्रार निवेदन दिले. ज्यात चौदावा वित्त आयोग निधी ,स्वच्छ भारत मिशन योजना, एम.आर.जी.एस. ची कामे ,दलित वस्तीतील कामे व शौचालय कामात जवळपास ५० लाखाचे भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आला.
  बारा दिवसाचा कालावधी लोटूनही पं. स. ने काही ही कार्यवाही केली नाही ,उपोषण सुरु केल्या नंतर भ्रष्टाचाराची चौकशीसाठी गटविकास अधिकारी यानी पथक गठन केली. पथकातील प्रमुख विस्तार अधिकारी मुसळे यानी तक्रारकर्त्यांना सुचना न देता परस्पर अंजनी सरपंच यांच्या उपस्थित थातुर माथुर चौकशी केली.

  चौकशी समितीने १२ तास चौकशी केल्याची बातमी दि.१० मार्च रोजी च्या काही वृत्तपञात प्रसिध्द झाली असल्यामुळे उपोषण कर्त्यांची दिशाभुल व चुकीची बातमी प्रकाशित झाली आहे . असा आरोप उपोषणकर्त्यांनी केले आहे.मंगळवार आमच्या प्रतिनीधीने उपोषण कर्तेची भेट घेतली असता कार्यरत सरपंच व चौकशी आधिकारी यांचे संगनमत असुन चौकशी करण्यास टाळाटाळ करतात.एकंदर ३५६ शौचालय ची मंजुर यादी आहे.
  मौजे अंजनी येथे भुजंग हांडे यांच्या एका कुंटूंबात सहा सदस्य आहेत त्यात एक जण अविवाहित असुन एकाच कुंटुबातील सहा सदस्यांना शौचालय मंजुर करण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. ही गंभीर बाब आसुन नियमानुसार अविवाहीत व्यक्तीला शौचालय देता येत नाही.

  उपोषणकर्त्यांने सदर भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी विरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन दि.१० मार्च रोजी मुख्यकार्यकारी जिल्हा परिषद नांदेड याना देवुन करण्यात आली. .उपोषणाचा आज पाचवा दिवस उगवला तरी बिलोली पं.स.चे गट विकास अधिकारी यांना तिळमात्र काळजी नाही. असे उपोषणकर्ते चौकशी समितीला सुनावले .यापुर्वी बिलोली तालुक्यातील पोखर्णी, कोल्हेबोरगाव , बोळेगाव आदमपुर येथील ग्रा. प. भ्रष्टाचारा संदर्भात उपोषण झाले होते. आता अंजणी ग्रा. प. भ्रष्टाचारा च्या चौकशी साठी पाच दिवसापासुन उपोषण चालु आहे.