रणजितसिंह मोहिते-पाटील एक लढवय्ये नेतृत्व

35

🔸स्वकर्तृत्वावर मिळवला जनाधार

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.11मार्च)मो:-भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह विजयसिंह मोहिते पाटील यांचे स्वकर्तुत्वाचे राजकारण बाळसं धरू लागलेले आहे, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना विजयदादांच्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांमधील राजकीय कारकिर्दीचा फायदा मिळालेला आहे, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेचे आमदार, राज्यसभेचे खासदार अशा उच्चपदस्थ ठिकाणी काम करण्याची संधी विजयदादांच्या कार्यकुशल नेतृत्वामुळे मिळाली.

असल्याचे राजकीय जाणकार व्यक्तींमधून राजकीय विश्लेषण केले जाते.रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेले आहे. माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणारा मतदार संघ पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने आलेला आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील विजयामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे बोलले जाते. माळशिरस विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. तो आमदार राम सातपुते यांच्या रूपाने उद्ध्वस्त करून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व निर्माण केले. भारतीय जनता पार्टी माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा मतदार संघात खासदार आणि आमदार भाजपचे निवडून आणून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेला असल्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी श्री शंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत स्वतःच्या ताब्यामध्ये घेऊन गेली दोन-तीन वर्ष बंद असलेला कारखाना यंदाच्या वर्षी गाळपासाठी सुरू केलेला होता. तो कारखाना सुरू करण्याकरता त्यांनी स्वतः प्रयत्न केलेले होते. विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून विकासासाठी निधी आणण्याकरता संबंधित मंत्र्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्वकर्तुत्वाने आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेली आहे. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी स्वकर्तुत्वावर राजकारणात जनाधार मिळवला आहे.