रेल्वेपुला जवळील संत खाजा बाबा दर्गा ची संरक्षण भिंत बांधण्यात यावी

25

🔸संत खाजा बाबा तारूमोहल्ला कमिटीची आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्याकडे मागणी

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.13मार्च):-संत खाजा बाबा दर्गा एक
जागृत दर्गा म्हणून गंगाखेड शहरात परिचित आहे. सर्वच जाती धर्मातील लोक या ठिकाणी येऊन आपली मन्नत या दर्ग्यात मागत असतात. या ठिकाणी प्रत्येक वर्षी खाजा बाबा यांच्या संदलचे आयोजन करण्यात येते. संत खाजा बाबा यांच्या दर्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यावर आले असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात हे दर्गा गोदावरी नदीच्या किनाऱ्याजवळ असल्याने दर्गाच्या खालच्या साईटचा भाग पाण्याने खचण्याची शक्यता असल्याने, संरक्षण भिंत बांधण्याची मागणी संत खाजा बाबा तारूमोहल्ला कमिटी यांच्यावतीने दिनांक 12 मार्च रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

खाजा बाबा कमिटी यांच्यावतीने आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून आमदार गुट्टे यांच्या हस्ते खाजा बाबा दर्गाला चादर चडवुन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी नगरसेवक राधाकिशन शिंदे, साहेबराव सातपुते, रासपाचे अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष राजू खान,एम आय एमचे सय्यद रुस्तुम, शेख साबेर, आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे शहराध्यक्ष शेख खालेद हे उपस्थित होते.

आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे मनोगत व्यक्त करीत मुस्लिम समाजाचा अनेक वर्षांपासूनचा जो प्रश्न होता शादी खाण्याचा तो आता पूर्णत्वाकडे आहे. त्यासाठी एक करोड रुपयांची मंजुरी झाली असून लवकरच हे काम चालू होणार आहे. शहरातील जे मुस्लिम कबरस्तान आहे त्यासाठी पंचवीस पंच लाख रुपये देण्यात येत आहेत.संत खाजा बाबा दर्गा यांच्या 200 फुटाची संरक्षण भिंतजी आपण मागणी केली आहे. ती पण लवकरच पूर्ण करणार असे आश्वासन यावेळी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी दिले आहे.हा कार्यक्रम यशस्वीसाठी सय्यद कलीम, सय्यद सलीम, शेख नदीम, शेख सलाउद्दीन ,शेख तुराब , महबूब शेख, मोहम्मदअली शेख, फतरुशेख, सय्यद जुबेर, शेख फरीद, सय्यद अमन, शेख फेरोज यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख खालेद यांनी केले.आभार शेख नदिम यांनी मानले.