५ लाख ५० हजार रुपये रोख व २ लाख रुपये किमतीचे सोने केले लंपास

49

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.16मार्च):-शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी जितेंद्र अमरनाथ राऊत यांचे घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच तीन तोळे चपलाकंठी तसेच १ तोळ्याची नेकलेस असे एकूण २ लाख रुपये किमतीचे सोने लंपास केल्याची घटना आज दि.१५ रोजी उघड़किस आली.स्थानिक रहिवासी जितेंद्र राऊत हे हॉटेल व्यावसायिक असून गावोगावी जावून हॉटेल व्यवसाय करतात.
शनिवारी काही महत्वाचे कामाने श्री राऊत व कुटुंबिय हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे गेले असता चोरट्यांनी त्यांचे रहातेघरी हात साफ केला.सदर कुटुंबियांचे चोखोबा वार्ड येथे निवासस्थान असून वरच्या माळ्यावरती सदर कुटुंबिय राहतात.तर खाली त्यांचे वृद्ध पिता राहतात.

सदर कुटुंबिय परत आल्यानंतर आज सदर घटना उघड़किस आली असून त्यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.सदर प्रकरणी तक्रार दाखल करताच पोहवा विवेक बंसोड़, शेखर डोंगरे यांचे डीबी पथकाने छानबिन सुरु केली असून संशयितास विचारपुस करीत आहेत.सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानेसुद्धा भेट देत चौकशी सुरु केली.वृत लिहिपर्यंत पोलिस कारवाई सुरुच असून सदर प्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.