घरकुल कामाचे धनादेश काढण्यासाठी अभीयंत्याना करावे लागते बांधकामाचे ‘ जीओ टॅग ‘

36

✒️नितीन पाटील(विशेष प्रतिनिधी)मो:-7038121829

नेरी(दि.16मार्च):-चिमुर तालुक्यात पंतप्रधान आवास योजना , शबरी घरकुल योजना , रमाई आवास योजना , या योजनांच्या घरांची कामे भरपुर प्रमाणात चालु आहेत .
नेरी परीसरात घरकुल योजनेचे घरांची कामे मोठ्या प्रमाणात चालु आहेत . काहींंचे घराचे काम पुर्ण झाले तर काहीचे जोता लेवल , सज्जा लेवल , पर्यंत काम झाले आहेत . पहील्यांदा घरकुल योजनेचा २०,००० हजाराचा धनादेश लाभार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेंंच्या खात्यात जमा होतो त्याला काही त्रास नाही पण जोता लेवल झाल्यावर दुसरा धनादेश काढण्यासाठी घरकुल लाभार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .कारण घरकुल वीभागातील अभीयंता घरकुल योजनेच्या कामाची पाहणी स्वतः करीत असतो .जोता लेवल , सज्जा लेवलची एका ऑप व्दारे ‘Geo tag’ ऑनलाईन प्रणालीने अभीयंता करीत असतो . तसेच एक फोटो व ग्रामपंचायतच्या सचीवाचे जोता लेवल , सज्जा लेवल , घर पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सुध्दा लागत असते.
त्यानंतर १५ दीवसांनी घरकुल लाभार्थ्याना धनादेश मीळतो कींवा रीजेक्टही होउ शकते .धनादेश लवकर मीळत नसल्यामुळे घराचे बांधकाम रखडुन ठेवावे लागत आहे .
यामुळे गरीब कुटुबांना घर बांधण्यासाठी मोठे संकट उभे होत असतानी दीसत आहे . घर बांधण्यासाठीचे साहीत्य बीना धनादेशाने कसे घ्यायचे हे लाभार्थ्यासमोर प्रश्न उभा आहे . ही अट लाभार्थ्याना मोठे संकट उभे करीत आहे .
एकीकडे शासन घरकुल योजनेचा फायदा देतो तर दुसरीकडे धनादेश काढण्यासाठी लाभार्थ्याना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे . घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना कसे – बसे करून घरचे पैसे लावुन घर बांधावे लागत आहे . ह्या प्रक्रीया करण्यासाठी घरकुल वीभागाला साधी नीयमावली बनवुन धनादेश लवकर मीळण्यासाठी शासनाने पाउल उचलावे अशी घरकुल योजनेच्या लाभार्थ्याकडून मागणी होत आहे .

🔹मनरेगातुन सुध्दा मीळतात चार टप्यात अनुदान

घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना मनरेगातुन ९० दीवसाचा रोजगाराचे काम चार टप्यात १८ ,००० रुपये मीळत असतात .चार टप्यात घरकुलाचे अनुदान मीळवीण्यासाठी चार मजुराचे बँकेचे पासबुक , आधार कॉर्ड , जॉब कॉर्ड लागते . ही सर्व प्रक्रीया ग्रामपंचायतचे सचीव व रोजगार सेवक करीत असतात . तर शौचालयाकरीत स्वच्छ भारत मीशन अंतर्गत १२ ,००० रूपये लाभार्थ्यास मीळत असतात.