सातोली गावचे वय वर्ष 80 असणारे वृद्ध शेतकरी बबन साळुंखे यांचे प्रहार सोलापूर टीम ने पुसले अश्रू

31

🔹जिथे अन्याय तिथे प्रहार

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.17मार्च):- दिनांक12 3 2021 रोजी करमाळा तालुक्यातील सातोली या गावचे शेतकरी साळुंखे वय वर्ष 80,आपल्याच मुलाकडून होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी,ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषणाला बसले होते, मुलांच्या वाटणी चा हिस्सा त्यांना देऊन काही जमीन आपल्या नावे ठेवली,आहे मुले त्यांचा सांभाळ करत नाहीत त्यामुळे स्वतःच्या स्व खर्चासाठी व उदरनिर्वाहासाठी शेतीचा काही भाग मी स्वतः कसून ती जमीन पिकवून ते उदरनिर्वाह करत होते परंतु स्वतःच्याच मुलांना त्यांनी स्वतः पिकवलेला शेतीतील ऊस चोरून नेऊन त्यांच्यावर उपाशी मरण्याची वेळ आणली या अन्याय विरोध दाद मागण्यासाठी ते शेतकरी करमाळा पोलीस स्टेशनला जाऊन मुलावर गुन्हा नोंद करा असे वारंवार सांगत होते परंतु लागलीच गुन्हा नोंद नं करता त्यांना त्यासाठी तीन-चार वेळेस सोलापूर जिल्हा ग्रामीण अधीक्षक कार्यालय येथे हेलपाटे घालावे लागले नंतर करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला.

गुन्हा नोंद होऊन सुद्धा संबंधित आरोपीला त्या ठिकाणी न बोलावता अटक न करता पुन्हा त्यांच्यावर अन्याय होऊ लागल्याने त्यांना काल सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालयाच्या पुढे 80 वर्षे वयात उपोषणाला बसावे लागले हा प्रकार प्रहार संघटनेला समजला असता तेथे धाव घेऊन त्या वृद्ध शेतकऱ्यांना मायेचा हात दिला आधाराचा हात दिला व दोन दिवसात सदर प्रकरणाचा योग्य तपास करून संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्या अशा प्रकारचा आदेश करमाळा पोलीस स्टेशनला सोलापूर ग्रामीणचे एडिशनल एसपी माननीय अतुल झेंडे सर यांनी दिला.
प्रहार संघटनेचे कृतज्ञता बघून त्या शेतकऱ्याला स्वतहाचे अश्रू अनावर झाले,त्यांना आधार आणि धीर देण्यासाठी प्रहार सोलापूर टीम पुढे सरसावली,यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी शहर कार्याध्यक्ष खालील मनियार जिल्हा उपाध्यक्ष वाशिम देशमुख करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर करमाळा संपर्कप्रमुख सागर पवार, यांच्यासह प्रहारचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.