शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू होणार- शिक्षक भारती

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चिमूर(दि.18मार्च):-शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी लागू करण्याबाबत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी २४ ऑगस्ट २०२० रोजी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना पत्र दिले होते. तसेच शिक्षणमंत्री व शिक्षण संचालक यांच्यासोबत आमदार कपिल पाटील यांनी चर्चा करून विनाविलंब वेतनश्रेणीचे लाभ देण्याची मागणी केली होती. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात सांख्यिकी माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिनांक १० मार्च २०२१ रोजी पत्र निर्गमित केले आहे.

वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळावे यासाठी शिक्षण विभागामार्फत दहा दिवसांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेतले जाणार आहे. त्यामुळे हजारो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,अशी माहिती शिक्षक भारती नागपूर विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,विभागीय उपाध्यक्ष रविंद्र उरकुडे,जब्बार शेख,राजाराम घोडके,दिवाकर लखमापूरे,नंदकिशोर शेरकी,विलास फलके,राजेश धोंगडे,रावन शेरकुरे,विजय मिटपल्लीवार,डाकेश्वर कामडी,प्रेम पवार,प्रविंद्र वानखेडे यांनी दिली आहे.