शिक्षणाधिकारी मा.तृप्ती अंधारे यांचा शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जाहीर सत्कार

36

✒️अहमदपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदपुर(दि.26मार्च):-लातुर जिल्हा परिषद माध्यमिक च्या नुतन शिक्षणाधिकारी पदाचा अादरणीय तृप्ती अंधारे मॅडम यांनी पदभार स्वीकारला असल्यामुळे व विनानुदानीत शिक्षकांना म्हणजेच नव्याने २०% अनुदान घेणार्‍या व वाढिव २०% अनुदान मिळणार्‍या शाळांना १७ मार्च २०२१ च्या राज्य सरकारने तात्काळ निधी वितरीत करण्याचे अादेश उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना दिले होते.

त्या अादेशाचे तातडीने पालन करत लातुर जि.प.च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी वेतन विभागाला तात्काळ वेतन देयके जमा करुन घेण्याचे व लवकरात लवकर निधी वितरीत करण्याचा अादेश देवुन विनावेतन काम करणार्‍या शिक्षक बांधवाना न्याय दिल्या बद्दल त्यांचे लातुर जिल्हा शिक्षक समन्वय संघाच्या वतिने जाहीर अाभार मानले व त्यांचा डायरी,पेन व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात अाला.

सत्काराला उत्तर देताना त्यांनी पुढिल वाढिव टप्पे असेच वेळेवर मिळावे असा अशावाद व्यक्त केला व शिक्षकांना येणार्‍या काळात कामही टप्याप्रमाणे द्विगुणीत होत जावे असा सल्लाही त्यांनी दिला.सत्कारा प्रसंगी लातुर जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक बाबासाहेब वाघमारे ,प्राचार्य बलभिम जगताप ,प्रा.एल एम शेख ,प्रा.सतिश कोठुळे ,प्रा.विनयकुमार ढवळे ,प्रा.सिध्दार्थ कांबळे,सोळंके सह अादि शिक्षक,प्राध्यापक उपस्थीत होते.