पोलिसांवरील हल्ल्याचा नागरिकांत संताप हणेगावमध्ये ठिकठिकाणी निषेध, समाजकंटकांवर कार्यवाहीची मागणी

31
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७.

हणेगाव(दि.1एप्रिल):-संपूर्ण जगाला कोरोना आजाराने विळखा घातला असून साऱ्या मानवजातीला ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. कोट्यवधी लोक कोरोणा बाधित झाले तर लाखो जणांचा यामध्ये बळी गेला असून संपूर्ण जग कोरोना संसर्गाच्या भीतीने भयभीत झाला आहे. अशावेळी देवरूप अवतार घेऊन या जगातील डॉक्टर, पोलीस विविध देशातील आणि विविध देशाच्या राज्यातील सरकारे जर ह्या कोरोनाच्या काळात माणसांना मदत, धैर्य, व सरकारच्या नियमाचे पालन व मानवाचे संरक्षण जर केले नसते तर आज अनेक देश व अनेक राज्य कोरोना ने गिळंकृत केले असते. पण पोलीस प्रशासनाने लाकडाऊनचा फार्मूला अमलात आणून अनेक माणसाला एकमेकापासून दूर ठेवून या कोरोनाला रोखण्यात यशस्वी होत आहेत तर हे कार्य करत असताना अनेक पोलिस व डॉक्टरांना आपला प्राण गमवावा लागला. अशा संकटमय प्रसंगी नांदेडमध्ये शीख समाजाच्या हल्लाबोल कार्यक्रमादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा हणेगाव विभागात निषेध व्यक्त केला जातोय.

कोरोना काळात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली महाराष्ट्रामध्ये कोरोणा ची लाट संपते न संपते पुन्हा दुसरी लाट आपले डोके वर काढले असून याचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्यात बसत असून दररोज हजारोंच्या संख्येने कोरोणा रुग्ण सापडत आहेत या जिल्ह्यात दि. २३ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी घोषित केल्यामुळे‌‌ सर्व सण, उत्सव, जयंती, लग्न, अशा अनेक कार्यक्रमावर शासनाने मनाई केली असून आपण सर्व जनतेने याचे पालन करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असतानाच काल दि. २९ मार्च रोजी नांदेड येथे धक्कादायक घटना सामोरे आली आहे. सचखंड गुरुद्वारा येथे दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी हल्ला हल्ला मोहल्ला ही पारंपरिक मिरवणूक निघते पण यावेळी नांदेड जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे व कोरोना वाढण्याच्या भीतीने पोलिसांनी ही मिरवणूक काढायला बंदी घातली कोरोना आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने ही पावले उचलली जात होती.
परंतु काही युवकांनी आम्हाला परवानगी का देत नाही. म्हणून हजाराच्या संख्येने जमाव निघाला व पोलिसांना मारहाण करण्यात आले. संरक्षण करणाऱ्यांनाच अशा पद्धतीची मारहाण होत असेल तर सामान्य माणसाची काय असा प्रश्न निर्माण झाला असून अशा वेळी सर्व जनता पोलिस प्रशासनाच्या पाठीशी उभी राहिले पाहिजे अशी प्रतिक्रिया हनेगाव विभागात होत असून या मारहाणीचे सर्व स्तरातून निषेध होत असताना चे सर्वांच्या तोंडून सर्वञ चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणात तात्काळ जातीने लक्ष घालून उपद्रवी समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली जात आहे.