लाल अंबाडी शरबत पावडर स्वतः तयार करणारी मीनाक्षी गेडाम

33

🔹आपल्या शेतातून अंबाळीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.4एप्रिल):- आयुर्वेदिक लाल अंबाडी शरबत पावडर, दरवर्षीप्रमाणे यावर्षी लाल अंबाडी शरबत पावडर स्वतः तयार केला आहे. उन्हाळ्यात तापमान वाढत जाते तसेतसे आपण घातक घटकद्रव्य असलेले थंडपेय पितो ते आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. आता लाल अंबाडी शरबत पावडर शेतकऱ्यांना प्रोत्साहन करून 100% आयुर्वेदिक पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे. उष्माघातापासून बचाव होते, ‘क’ जीवनसत्व असतात आंबाडी मध्ये लोह भरपूर असते.

वजन कमी करण्यासाठी, पचन व्यवस्थित होते अनेक पोषण तत्वानी परिपूर्ण. असा हा गुणकारी अंबाडी शरबत ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथिल ग्रामपंचायत सदरय सौ. मिनाक्षी सिताराम गेडाम यांनी आपल्या शेतातून अंबाडीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला आहे.त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांना धाव हळदा घेतली आहे. ग्रामीण व शहरी भागात अंबानीचा सरबत उन्हाळ्यामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगला असल्यामुळे विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आमच्या प्रतिनिधी जवळ सौ मीनाक्षी सिताराम गेडाम यांनी बोलताना सांगितले.

सध्या मी दोन चार वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये हा व्यवसाय करीत आहे. या व्यवसायामुळे मला व्यापाऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मी एक शिक्षकाची पत्नी आहे व सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे मी नेहमीच चळवळी भाग घेत असतो. त्यामुळे हळदा येथील लोकांनी मला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले. मी एक कर्मचाऱ्यांची पत्नी असताना सुद्धा हे कार्य करू शकतो तर सर्वसामान्य महिलांनी का करू नये असा प्रश्न सुद्धा यावेळी मांडला. मनामध्ये जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा असला तर आपण कोणतेही काम करण्यास मागे येऊ शकत नाही. मी या कामामुळे गावातील दोन -चार महिलांना सुद्धा काम देत असतो. सदर महिलेचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.