जनतेचा प्रामाणिक विश्वासू चेहरा वैभवजी गिते

21

वैभव तानाजी गिते हे राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन व नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ महाराष्ट्र या संघटनेचे राज्याचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.राज्यात ॲट्रॉसिटी कायदा तज्ञ कार्यकर्ता व व्याख्याता म्हणून वैभव गीतेंची घराघरांमध्ये ओळख आहे.अनेक शासन निर्णय,परिपत्रके दिनांकासह तोंडपाठ असणारा आंबेडकरी चळवळीतील आक्रमक प्रामाणिक लढवय्या नेता म्हणून वैभव गीतेंचा नावलौकिक आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात परिवर्तनवादी चळवळीतील नेत्यांची आदरयुक्त ओळख असणारा तरुण कार्यकर्ता म्हणूनसुद्धा वैभव गितेंचे नाव आदराने घेतले जाते.

महाराष्ट्राचे महासचिव अॅड.डॉ.केवलजी उके साहेबांच्या सारख्या कायदा तज्ञांचे सखोल मार्गदर्शन आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विकास धाइंजे यांच्यासारख्या प्रामाणिक नेत्यांची भर तारुण्यापासूनच सोबत लाभल्याने आयुष्याला कलाटणी मिळाली असे वैभव गिते कित्येकदा निसंकोचपणे सांगतात.ज्यांच्या बोटाला धरून शिकलो त्यांच्याप्रती आजन्म आज्ञाधारक बनून अचूक ध्येय गाठेन असे अनेकवेळा सभांमध्ये बोलतात त्यांच्या भाषणांमध्ये शिव,फुले,शाहू,आंबेडकरी विचारधारेची आक्रमकता,अचूकता,पारदर्शकता,सत्यस्थिती व सद्यस्थिती नवीन जुन्या उदाहरणांसह अफलातून मंडण्याचे कौशल्य असल्याने जनता तासंतास वैभव गीतेंचे विचार ऐकायला बसते.

पीडित कुटुंबास दिलेले आश्वासन आणि शब्द खरा करण्यासाठी प्राण पणाला लावणारा नेता म्हणून तरुणांमध्ये क्रेज व चर्चा असणारा नेता म्हणजे वैभव गिते होय!चळवळीतील कार्यकर्ता जगला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे म्हणून आदरणीय वैभव गिते हे रात्रणदीन एक करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातजावून आवाज उठवतात गोरगरीबांचे शुल्क काम असेल या एखाद्या पिडीतावरील अन्याय अत्याचार झालेला त्या वर आवाज उठवणे व त्या पिडीतांना न्याय मिळवून देणे असेल व त्या पिडीतांना न्याय मिळेल पर्यंत थंड कधी बसलेले नाही, अनुसूचित जाती जमाती च्या बजेट वरील विषय असेल या त्या माध्यमातून, विभागातून निघणाऱ्या योजनातून लोकांना मिळणाऱ्या सोई असतील त्या ठिकाणी योजनाचा लाभ जर गरजूंना मिळत नसेल तर तो कसा मिळेल या कडे लक्ष वेधून धरत असे हे वैभव गिते.कलावंत,शाहिराचा विषय असेल या इतर कोणत्याही जातीधर्माच्या व्यक्ती ची समस्या त्या वर धावून जावून काम केलेले पाहिले आहे.

गेल्या वर्षी लाॅकडाऊनच्या काळात ज्या लोकांचे पोट हातावर आहे.व त्या लोकांना हाताला काम मिळाले नाही.अस्या हजारो कुटुंबियांना मायेचा हात देऊन नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ महाराष्ट्र च्या वतीने वैभव गिते यांच्या माध्यमातून अनेकांना दोन तीन महिने पुरेल इतके अन्न धान्यच्या किट वाटप करण्यात आल्या व अनेक कुटुंबांना भुक बळी पासून वाचवण्यात वैभव गिते यांचे योगदान आहे. महाराष्ट्रातील एकमेव बोलके उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वैभव गिते व विकास धाइंजे या गुरूशिष्याच्या जोडीने साडेतीन लाखाचा एक असे 157 मिनी ट्रॅक्टर वेगवेगळ्या जाती-धर्माच्या बचतगटांना मिळवुन दिले आहेत.जिल्ह्यात अनेक जाती-धर्माच्या नागरिकांच्या घरकुलांना हक्काची शासकीय जागा मिळवून दिली.

सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वैभव गीतेंच्या कामाचा आवाका आणि तळमळ पाहून सोलापूर जिल्ह्याच्या महत्वाच्या अश्या म्यान्यूअल स्कॅवेंजिंग कमिटी वर विद्यमान सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.पहिल्याच बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.अशी अनेक रचनात्मक कामे सांगता येईल.आंबेडकरी चळवळीतील अनेक प्राध्यापक, विचारवंत,लेखक,वकील,शिक्षक,गायक,शाहीर वैभव गीतेंवर अतोनात प्रेम करतात.एवढ्या कमी वयात महाराष्ट्रभर फिरून जनतेचे प्रश्न सोडवणारा गावपातळीपासून ते राष्ट्रीय प्रश्नांची उकल असणारा जिल्ह्यात,मंत्रालयात,व केंद्रीय शास्त्रीभवन येथे कामाचा व नावाचा दबदबा असलेला नेता म्हणजे वैभव गिते होय

✒️लेखक:-संजय कांबळे(कार्यकर्ता नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टीज NDMJ महाराष्ट्र ( मराठवाडा उपाध्यक्ष)
मो नं.9860208144