गांधीनगर येथील विकास धोंगडे बनला पी.एस.आय

31

🔹सेवानिवृत्त लाईनमेनचा मुलगा बनला पी.एस.आय

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.23एप्रिल):- मधील गांधीनगर येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त लाईनमेन विश्वनाथ धोंगडे व भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा गांधीनगर शाखाध्यक्ष आशा धोंगडे यांचा विकास हा चिरंजीव आहे.

केंद्र शासनाने सन २०१८ रोजी घेतलेल्या (एस.एस.सी.-सी.पी.ओ.) स्टप सिलेक्शन कमिशन अंतर्गत सेंट्रल पोलीस ऑफिसर या झालेल्या परीक्षेत विकास हा पास झाला .व त्याची सशस्त्र सीमा बल मध्ये सब इंस्पेक्टर या पदाकरिता निवड झाली आहे.

विकासचे प्राथमिक शिक्षण हे शकुंतलाबाई देशमुख प्राथमिक शाळा पुसद येथे झाले.पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण कोषटवार (दौ)विद्यालय येथे झाले. दहावी नंतरचे शिक्षण फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे झाले .

विकासने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रेरणास्थान माणून हे यश संपादन केले आहे .या यशाचे श्रेय त्यांनी आई वडील यांना दिले .यशाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.