मूरसा येथे जागतिक पशुसंवर्धन दिन साजरा

25

✒️मुरसा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मूरसा(दि.1मे):- पशुसंवर्धन विभाग प. स. भद्रावती अंतर्गत पशु वैद्यकीय दवाखाना मूरसा येथे जागतिक पशुसंवर्धन दिन साजरा करण्यात आला. स्वच्छता अभियान राबविण्यात आले अंगणे सडा रांगोळ्यांनी सजविण्यात आले व भजन मंडळींच्या साथीने गौ मातेची पुष्प वर्षावात अतिशय सुरेख आरती करण्यात आली कार्यक्रम स्थळी गोपाळकाला करून ग्राम वासीयांना प्रसाद वाटप करण्यात आला.डॉ नंदकिशोर मैंदळकर यांनी पशुधनाविषयी संबोधन केले आज जागतिक पशुसंवर्धन दिन साजरा करीत आहो कृषी प्रधान देशाला पशुधनाची जोड आवशक आहे पशुधन दिवसेंदिवस घटत आहे गोधन वाचवायचे असेल तर देशातील कत्तलखाने बंद होणे आवश्यक आहे गाईला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे लागणार आहे.

अन्यथा देशात वाघ,शिंह जसे नामशेष होत आहे तसेच गाय, बैल,मैस नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.एक गाय ठेवा अंगणात त्याचा आनंद मावेना गगनात.आईच्या दुधानंतर गाईच्या दुधाला फार महत्व आहे परंतु तेच नष्ट व्हायचा मार्गावर आहे पशुधनाशिवाय हरित क्रांती,कृषी क्रांती,धवल क्रांती संभव नाही.संपूर्ण गोवंशाच्या कत्तलीवर बंदी व्हायला हवी कृषिची अर्थव्यवस्थाच पूर्णपणे पशुधनावर आहे धवल क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरियन तसेच अमेरिका येथील हरित क्रांतीचे प्रणेते नॉर्मन बोरलॉग यांनी सुद्धा मान्य केले आहे.संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दुधळू गाई,किंवा बैल जोडी दिल्या जाते विनोबा भावे व गांधीजींनी स्वतंत्र भारताला तीन कार्यक्रम दिले त्यात गोवधबंदी,नशाबंदी,अस्पृश्यता निवारण यांचा प्रचार सुद्धा केला ज्याठिकाणी गोधनाचा वास असतो त्या परिसरात कुठलाही आजार शिरकाव करीत नाही सध्या कोरोनाने जगभर हाहाकार माजविला आहे.

परंतु ग्रामीण भागात याचे प्रमाण नगण्य आहे.याचे कारण गाईच्या शेणात ऑक्सिजन ची मात्र मोठ्या प्रमाणात असते गाईच्या गोवरीवर शुद्ध तूप टाकून घरात जाळल्यास ऑक्सिजन निर्माण होऊन आरोग्य सुदृढ होते कोरोनामुळे ऑक्सिजन चे महत्व दुनियेला कळले प्रत्येकाने एक देशी गाय व एक झाड लावण्याचा संकल्प करावा आपण सर्वांनी गोवंश वाचविण्याचा विडा उचलू गौ वंश बाचेगा देश बाचेगा असे नारे लावण्यात आले.मी गाय कसायला कधीही विकणार नाही व लावलेल्या झाडाला जगविण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन असे वचन ग्रामस्था कडून घेण्यात आले कार्यक्रमाची सांगता प्रसादाने झाली.ग्रामस्थांनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.