दारू गोडाऊन वॉचमनला बांधून 27 लाखांची दारू चोरी केली

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि 11मे):-शहरालगत शिंदे गाव गावातील एका दारूच्या गोडाऊन वॉचमनला मारहाण करून चादरीच्या पट्ट्याने बांधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 27 लाख रुपये किमतीच्या दारूच्या बॉक्सचे टेम्पोतून चोरी केली आहे आहे सदर गोडावून फोडून तब्बल 27 लाख रुपये किमतीचे 370 बॉक्स दारू रात्री दोन वाजे सुमारास चोरून नेले दृश्य चित्रीत. झाली आहे सदरची घटना शिंदे गावाजवळील नायगाव रोड वरील नोकिया कंपाऊंडमधील राजस्थान लिकर लिमिटेड कंपनी गोडाउन मध्ये घडली.

असून अज्ञात चोरट्यांनी या गाळे चे शटर उचकटून कुलूप तोडून चोरी केले दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश दाभादे पोलीस अधिकारी विलास शेळके यांनी भेट दिली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे