पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने वाचले युवतीचे प्राण

25

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.१६मे):-रागाचे भरात एका अविवाहित युवतीने वणा नदी पुलावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न काल रात्री उघड़किस आला. सदर घटनेच्यावेळी एका पोलिस कर्मचाऱी विनोद कांबळे ब़ .१२ ८० यांची नांदगाव चौरत्यावर डिवठी होती एक फोन आल्या बरोबर त्यानी तत्परता दाखवून काही युवकांच्या मदतीने तिचा जीव वाचवला तीला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.डॉक्टरांनी तीला उपचार करीत गंभीर जखमी झाल्याने सेवाग्राम रुग्णालयात पाठविले.

काल रात्री ९ वाजताचे दरम्यान हा प्रकार घडला असून काही युवकांच्या सहकार्यामुळे तसेच पोलिस शिपाई विनोद कांबळे यांच्या प्रसंगावधनाने त्या युवतीचे प्राण वाचले.पोलिस कर्मचारी यांनी त्या युवतीच्या मोबाइलवरुन तात्काळ तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.सदर युवतीला एका युवकाचे मदतीने स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ पोचविणाऱ्या पोलिस कर्मचारी विनोद कांबळे यांचे युवतीच्या कुटुंबियांनी आभार मानले.