पशुधन विकास अधिकारी डॉ. वाय.एच.धोत्रे यांना कुंटूर येथील मेंढपाळांच्या वतीने सन्मानाने दिला निरोप

42

✒️चांदू आंबटवाड(नायगांव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

कुंटूर(दि.१६मे):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर संस्था कुंटूर च्या वतीने पशुधन विकास अधिकारी डॉ. वाय.एच.धोत्रे साहेबांचा काल खंडोबा मंदिर कुंटूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांचा यथोचित सत्कार करून संस्थेच्या वतीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा भेट देण्यात आली. मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी सर्व मेंढपाळांची मनं जिंकली होती.ऊन,वारा, पाऊस किंवा कोरोना ह्या बाबी त्यांच्या कर्तव्याच्या आड कधीच आल्या नाहीत. चिकाटीने व तत्परतेने त्यांनी पशुधनाची सेवा केली.

त्यामुळेच रुण व्यक्त करण्याच्या उद्देशाने मेंढपाळांच्या वतीने छोटासा प्रयत्न.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कुंटूर नगरीचे मा.सरपंच रुपेश भैय्या कुंटूरकर यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवान पा.कदम,ग्रामपंचायत सदस्य माधव डोके, पत्रकार चांदू आंबटवाड,सुत्रसंचालन मारोती बिस्मील्ले सर यांनी सांभाळले.या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी संस्था कुंटूरचे अध्यक्ष चंद्रकांत महादाळे, उपाध्यक्ष माधव डोके, अशोक महादाळे, मल्लु देवदे,खंडू बहीरे,गणेश बिस्मील्ले, रामा शिगळे,पोचू शेट्टे,मालू बिस्मील्ले, गोविंद शिगळे, लक्ष्मण शिगळे, आनंदा शिगळे, संभाजी गुंठे,कोमराजी महादाळे, मोहन बिस्मील्ले, बालाजी महादाळे, विठ्ठल बहीरे, बालाजी संभाडे व पोतलाजी संभाडे ईत्यादी मेंढपाळ बांधव हजर होते.