दहिवडी ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण तज्ञ यांच्या कारभाराची चौकशी करा-सनीदेव खरात

30

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

म्हसवड(दि.20मे):-दहिवडी ग्रामीण रुग्णालयातील
क्ष किरण तज्ञ, (एक्स रे) रवी पाटील दहिवडी हे सातत्याने कामावर गैरहजर असतात तसेच ज्या ज्या वेळेस एक्स-रे काढायचा असेल त्यावेळेस ते मशीन बिघडली असे कारणे सांगतात व रुग्णांनाचे एक्स रे काढत नाहीत, लोकप्रतिनिधींना आडवी तिडवे बोलून लोक सेवकाचा अपमान करणे तसेच लाखो रुपये किमतीचे एक्स रे मिशन गेली सहा महिने बंद आहे.

तरी ,त्या वरती दुरुस्तीबाबत कुठले प्रकारचा प्रस्ताव, पत्र सुध्दा सिव्हील हॉस्पिटला दिलं नाही तसेच इतर साधन सामग्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते, व रुग्णांनी या ,ना ,त्या कारणामुळे खाजगी दवाखान्यात जाण्यास प्रवृत्त केले जाते तरी सदर पाटील हे वकिलीची डिग्री असल्यामुळे खोट्या तक्रारी मध्ये अडकवण्याची धमकी देऊन, लोकांना सेवा नीट देत नाहीत त्याचे संबंधीचे सेवापुस्तक तपासणी करण्यात यावे, तसेच पत्नी-किरण तांदळे-कनिष्ठ लिपिक म्हणून तिथेच असल्यामुळे फक्त ऑफिसरची रजिष्टरवर सह्या केल्या जातात.

ड्युटीवर कमी आणि शेतात आणि घरी जास्त असतात तरी
कोणी विचारले तर खोट्या तक्रारीत अडकवून देऊ अशी धमकी देतात तरी संबंधित रवी पाटील यांच्या कामकाजाचे तपासणी करण्यात यावी तसेच एक्स-रे मशीन दुरुस्त न करणे ,एक्स-रे न करता इतर दवाखान्यात पेशंटला जाण्यास प्रवृत्त करणे या सर्व बाबीची सखोल चौकशी करावी तसेच कामावर लागल्यापासून त्यांच्या मालमत्तेची व संपत्तीची चौकशी करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या वतीने सातारा सिविल हॉस्पिटल समोर आंदोलन करण्यात येईल