ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्या जिल्हासहसचिव पदी जावेद अहेमद यांची निवड

30

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलुर(दि.२०मे):- नांदेड जिल्हा ऑल इंडिया तन्जीम ए इंसाफच्या दि.१६ मे २०२१ रोजी वार्षिक बैठक घेण्यात आली.या बैठकीत जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद,उपाध्यक्ष मोईन कुरेशी, सचिव ॲड. श्रीधर कांबळे, भीमराव जाधव , प्रोफेसर जुबेर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.त्यात नांदेड शहर अॉल इंडिया तंझीम ए इन्साफ या सामाजिक संघटनेच्या नांदेड जिल्हासहसचिव पदी देगलूर तालुक्यातील सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार जावेद अहेमद यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीचे अॉल इंडिया तंन्जिम ऐ इंन्साफचे तालुकाअध्यक्ष ॲड.विलायतअली काझी, सय्यद बासीत ,हबिब रहेमान ,शेख असलम ,अब्दुल हई, शेख अफजल अटकळीकर , शेख रफीक अहेमद ,प्रहार संघटनेचे तालुकाप्रमुख कैलास येसगे कावळगावकर ,ॲड.अविनाश सुर्यवंशी , बिलोलीचे सय्यद रियाज व सर्व तालुक्यातील पत्रकारांनी त्यांचे स्वागत केले.