शेतकऱ्यांना मुख्य व्यवसायात सोबत ‘मशरुम शेती ‘ फायदेशीर: डॉ.दिलीप हांडे

28

🔹बिडकर महाविद्यालयात “मशरूम शेती: एक व्यावसाईक संधी” विषयावर आभासी चर्चासत्र

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.21मे):-स्थानिक रा. सु. बिडकर महाविद्यालयात आय. क्यू. ए. सी. च्या वतीने एक् दिवसीय राष्ट्रीय स्तरीय आभासी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. दिलीप व्ही. हांडे, प्राध्यापक वनस्पतिशास्त्र, श्री शिवाजी विज्ञान महविद्यालय अमरावती हे होते. मशरुमचे विविध उपयोग तसेच मशरूम शेती कशी करावी या विषयीची माहिती त्यांनी दिली. विदर्भातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मुख्य व्यवसायासोबत मशरूमची शेती केल्यास त्यांचा जीवन जगन्याचा स्तर उंचावेल, तो कर्जबाजारी होणार नाही आणि आत्महत्येचा विचार करणार नाही असे त्यांनी प्रतिपादन केले.

या चर्चासत्रातील दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक श्रिमती तृप्ती धकाते (जगताप), संस्थापक क्वालीटी मशरूम फार्म, पुणे हे होते. मशरूम च्या विविध जाती, बटण व आयस्टर मशरुम्,या प्रजाती विदर्भातील शेतकर्यांसाठी कशा उपयुक्त आहे या विषयी मार्गदर्शन केले. मशरूमचा वापर अनेक रोगावर कसा करता येतो यांचे महत्व विषद केले. अगदी कमी जागेत आणि कमी भांडवल वापरुन जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येतो या बद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली.

या चर्चासत्रात एकूण ४३२ व्यक्ती नोंदणी करून सहभागी झाले होते. आपल्या राज्यातील अनेक विद्यापिठातील तसेच राज्याबाहेरील लोकांचा देखील यात सहभाग होता.या चर्चासत्राचे उदघाटन ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा, डॉ. प्रा. उषाकिरण थुटे यांनीं केले. अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. बी. जि. आंबटकर यांनी, संचालन उपप्राचार्य डॉ. बी. एम. राजूरकर यांनी, प्रास्ताविक आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. एस. आर. विहीरकर यांनी, आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. बी. बोढे यांनी तर तांत्रिक सहकार्य गौरव जामुनकर यांनी केले. चर्चासत्राच्या यशस्वीते साठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.