तेरविचा खर्च न करता भिक्कु निवास बांधकाम व वाचनालयास धम्म दान

22

✒️सचिन महाजन(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.22मे):-तळेगांव रघुजी ता. आर्वी रहीवासी स्थित सौ सुमित्राबाई हनुमंतराव रामटेके हयांचे नुकतेच स्वागत कॉलनी वर्धा येथे निधन झाले होते. त्यांच्या निर्वाणानंतर येणारा जलदान-तेरवीचा खर्च त्यांचे परीवाराने केलेला नसुन सुमित्राबाई हयांनी निधनाच्या पुर्वी बँकेतून जी रक्क्म काढली होती ती रक्क्म व त्यांच्या परीवाराकडून तेराव्यास येणारा खर्च असे सेवाग्राम रोड, वरुड येथील भिक्कु नागितबोधी हयांच्या पुढाकाराने बांधण्यात येणा-या भिक्कु निवास व वाचनालयास सदर निधी धम्मदान म्हणून देण्यात आली.

सदर निधी हा भिक्कु निवास बांधकाम व वाचनालयाच्या कामी खर्च करणार असल्याचे नागीत बोधी हयांनी सांगीतले तसेच त्यांनी हया कार्यास अजून नागरिकाने पुढाकार घेवून धम्मदान करण्याचे आवाहन केले. हयाप्रसंगी त्यांनी बौध्द धम्माबददल उपस्थितानां मार्गदर्शन केले.