पावसाळा सुरू होण्याआधी लवकरात लवकर शेतीविषयक विद्युत कामे पूर्ण करा- आमदार संजय रायमुलकर

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मेहकर(दि.22मे):-मेहकर येथील MSEB कार्यालयात मेहकर-लोणार संबंधित अधिकारी व कर्मचारी सोबत विविध प्रश्न,समस्या यावर आढावा व पुढील नियोजन बैठक पार पडली.सध्या कोरोना परिस्थितीत खाजगी व शासकीय कोविड सेंटरचा विद्युत पुरवठा 24 तास सुरू ठेवणे,तसेच ग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्यास प्रोत्साहित करणे या विषयावर चर्चा झाली.

लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर यांच्या कडे वारंवार शेतकरी समस्या मांडत आहे. जसे शेतातील पाणी पुरवठा लाईन खंडित राहत आहेत व पावसाळा सुरू होण्याआधी लवकरात लवकर शेतीविषयक विद्युत कामे पूर्ण करावी,इ.प्रश्न मार्गी लावण्याचे सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.तसेच ग्राहकांनी ऑनलाइन बिल भरण्यासाठी व घरच्या मीटरचे रिडींग घेणे व पाठवण्यासाठी म्हणजे तुम्ही स्मार्ट ग्राहक व्हावे,असे ग्राहकांना आव्हान करण्यात आले आहे.

तसेच मागील काळामध्ये निधी मधील किती कामे केली आहेत व कोणत्या योजना अंमलात आणल्या, याची यादी तात्काळ मला सादर करावी,असे आदेश लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर यांनी दिले.या बैठकीला स्वतः लोकप्रतिनिधी संजय रायमुलकर,सभापती दिलीप बाप्पू देशमुख,एक्सिकेटीव्ही इंजिनीअर जयभाये साहेब,उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती मेहकर बबनराव तुपे व मेहकर-लोणार MSEB विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.