कळवण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने लसीकरण घेण्यासंदर्भात जनजागृती

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.23मे):- कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना एन.सी.सी. विभागाच्या वतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सऍप, फेसबूक व तसेच यूट्यूब यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या खबरदारीच्या उपायांबरोबरच लसीकरण करून घेण्याबाबत जनसामान्यांमध्ये चित्रफितीच्या माध्यमातून जनजागृती केली.लसीकरणाबाबत कुठल्याही अफवांना तसेच गैरसमजांना बळी न पडता लसीकरण करून घेणे व इतरांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे हे त्यांनी चित्रफितीच्या माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न केला.

तसेच प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे आदी आवाहन केले. कोरोनाच्या ह्या बिकट प्रसंगी लोकांनी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे. ह्या लसीकरण जनजागृती मध्ये एनसीसी छात्र सैनिक यश गवळी,रिना बाविस्कर, खुशाली सोनवणे, पूजा देवरे व पूजा मोरे यांनी कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.

व त्या संदर्भात चित्रफित बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या. या बाबतीत एन.सी.सी. प्रमुख प्राध्यापक.लेफ्टनंट बी .सी .कच्छवा यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष मा. ॲडव्होकेट शशिकांत पवार तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.रावसाहेब शिंदे , प्राचार्य डॉ. बी.एस.पगार, उपप्राचार्य प्रा. आर.जे.कापडे व सात महा.बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ए. के. सिंग व एडम ऑफिसर कर्नल राकेश कॉल यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.