माळी सेवा मंडळ खामगाव च्या वतीने स्व खासदार श्री राजीवजी सातव यांना श्रद्धांजली अर्पण

23

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलडाणा(दि.25मे):- समाजभूषण सर्वांचे प्रेरणा स्थान दिवंगत खासदार स्व श्री राजीवजी सातव यांचा अस्थिकलश रथ , सध्या बुलढाणा जिल्ह्यात असून आज सोमवार दि 24 मे ला सायंकाळी त्यांच्या रथाचे आगमन शेगांव येथून ,खामगाव शहरात झाल्या नंतर तालुक्यातील समाजबांधवा साठी माळी भवन खामगाव येथे अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता, माळी सेवा मंडळ, खामगाव यांच्या वतीने माळी भवन खामगाव येथे मोजक्याच समाजबांधवा च्या उपस्थिततीत व शासनाचे निर्देश पाळून आयोजित अस्थिकलश दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झालाआहे.

या प्रसंगी डॉ सदानंद धनोकर, प्रा गजानन खरात, अजय तायडे, सुशिलाताई वावगे, यांनी आपल्या मनोगतातुन श्रद्धांजली वाहिली , आज आयोजित कार्यक्रमात खालील मान्यवरांनि अस्थीकलशाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली .
प्रल्हाद भाऊ बगाडे, अध्यक्ष माळी सेवा मंडळ,
डॉ सदानंद धनोकार, माजी सभापती पं स खामगाव
प्रा खरात लोणार, जिल्हा अध्यक्ष OBC सेलअनंत सातव , सदस्य, पं स खामगाव खिरोडकर साहेब, शाखाधिकारी खामगाव अर्बन बँक गोपाळ सातव, मा उपसभापती
सचिन वानखडे, मा उपसरपंच, पिंपळगाव राजा
सुशिला वावगे ताई, तालुका अध्यक्ष, OBC ,
अजय तायडे, प्रदीप सातव, सचिव माळी सेवा मंडळ, अमोल चरखे,पत्रकार, पुरुषोत्तम सातव, महादेवराव खंडारे, देविदास उमाळे,नंदू भाऊ सातव अनिल सातव, अरविंद शिंगाडे,, दत्ता जवळकर, मीडिया सेल
सुरेश बगाडे, मनोज वानखडे, शांताराम करांगळे,
संतोष निलखन,विशाल सातव, विभूते साहेब,
निलेश वावगे,सुरज बेलोकर, मनोज भोपळे
कार्यक्रमाचे संचालन अरविंद शिंगाडे तर प्रस्तावीक अजय तायडे यांनी केले .