खतांची विक्री जुन्या दरानेच करण्यात यावी- आमदार श्र्वेताताई महाले -पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

31

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि.26मे):-खतांची विक्री जुन्या दरानेच करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्याकडे चिखलीचे आमदार मा. श्र्वेताताई महाले यांनी खते वितरकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली.

केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढविलेल्या नसल्या तरी सुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढविले. पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी खतांवरील सबसिडी वाढवून ही खते उत्पादक कंपन्या वितरकांकडून वाढीव दरानेच रक्कम घेत आहेत. मा मोदीसाहेबांनी सबसिडी वाढवून दिल्यानंतर वितरकांनी आगावू भरलेली रक्कम खते कंपन्या परत देत नाही. किंमती कमी झाल्याच्या खते कंपनी कडून कोणत्याही सूचना नसल्याने नाईलाजाने लहान मोठ्या खते वितरकांना खतांच्या किंमती निश्चित सांगता येत नाहीत. त्यामुळे खतांच्या किंमतीबाबत असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी खत वितरकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांना केली असता त्यांनी खते जुन्या दरानेच देण्याचे आश्वासन दिले आहे.

याबाबत कोरोमंडलम आणि IPL या दोन कंपन्यानी केंद्र सरकारने सबसिडी वाढवून दिल्या नंतर ही भाव कमी करण्यासाठी कोणतीच हालचाल न केल्याने संभ्रम अजून वाढला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दोन्हीही कंपनीच्या प्रतिनिधी सोबत बोलून मार्ग काढणार असल्याचे देखील सांगितले आहे.शेतकर्‍याशी निगडीत प्रश्न मा. श्र्वेताताई महाले पाटील यांनी मांडल्यामुळे शेतकरी वर्गाकडुन लोकप्रतिनिधी असावा तर असा असे बोलले जात आहे