पत्रकार सुरेश सालमोटे यांना बेदम मारहाण

68

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.29मे):-तालुक्यातील राणीसावरगांव येथे दि- 28/05/2021 वार शुक्रवारी सायंकाळी सहा च्या दरम्यान जुन्या आठवडी बाजारात बोलावून पत्रकार सुरेश सालमोटे यांच्या वर विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली असून याच्यामुळे माझ्या जीवास धोका निर्माण झाला आहे. माझ्या वर कुंटुबाची जबाबदारी आहे आणि भर बाजारात घरून बोलावून घेऊन विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आहे.मी जखमी अवस्थेत असताना राणीसावरगांव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असताना. त्याठिकाणी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

त्यांना मी माझे मेडिकल करण्यासाठी सांगितले त्यांनी उशीरा माझे मेडीकल करण्यासाठी त्यांचा कोणताही एक ही पोलिस कर्मचारी सोबत आला नाही ही किती मोठी खेदाची बाब आहे.दुसरी बाब मेडिकल रिपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया उशीरा करण्यात आली असून.लाँकडाऊनच्या काळात भर बाजारात राजराजपणे माझ्या वर हल्ला केला असून माझी तक्रार दाखल केली नसल्याने माझ्यावर झालेल्या मारहाण केल्या प्रकरणी
न्याय मिळावा