दिवंगत क्रुषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा तिसरा स्मुर्तीदिन

32

✒️खामगावप्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.31मे):-शतप्रतिशत भाजपा चा नारा संपुर्ण राज्यात पोहचवणारे आमदार,खासदार,प्रदेशाध्यक्ष,विधान परिषद सदस्य,क्रुषीमंत्री असा प्रवास करणारे भाऊसाहेब पांडुरंग पुडलिक फुंडकर यांचे राज्याचे क्रुषीमंत्री असतांना निधन झाले.

मंत्री पदाचा लाभ बुलढाणा जिल्हापालकमंत्री चा लाभाने विशेषता खामगाव विधानसभा हा विकासाला मुकला अशी भावपुर्ण आदरांजली वाहतांना भाजपा नेते माजी नगराध्यक्ष गणेश माने यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.

यावेळी मराठा महासंघाचे कार्यकर्ते सह भाऊसाहेब फुंडकर प्रेमी विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी शेगाव रोड स्थित असलेल्या स्मुर्तीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहली.