ओबीसी कर्मचारी याना पदोन्नती मध्ये आरक्षण द्या

33

🔸राष्ट्रीय ओ. बी. सी. महासंघ ब्रम्हपुरी यांची मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.31मे):- इतर मागासवर्गीय (OBC) कर्मचाऱ्यांना सोडून सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये नाहीत आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र ओबीसींना मिळत नाही है घटनेतील समानतेच्या तत्वाला छेद देणारे आहे. सदर असमानता दूर सारण्यास OBC ना पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद तरतूद अगत्याचे करण्यात याचीच सन २००६ मध्ये शासनाने मा.स्वरूपसिंह परिवहन मंत्री महा राज्य यांच्या अध्यक्षतेखाली OBC ना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावा या विषयावर अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन करण्यात आलेली होती. व या समितीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोक-यांमध्ये ९९% आरक्षण देण्यात यावे अशी महत्वपूर्ण शिफारस केली होती मात्र आजपर्यंत शासनाने जाणीवपूर्वक या शिफारशीची अमलबजावणी केली नाही.

सन २००४ मध्ये शासनाने कायदा करून SC ST. NT. VINT व विशेष मागास प्रवर्ग यांना पद्धतीमध्ये आरक्षण दिलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर यातील बरेच प्रवर्ग इतर मागास प्रवर्गात समाविष्ट असूनही राज्यात मात्र ओबीसींना सदर लाभापासून सोयीस्करपने वंचित ठेवण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात “एकाला न्याय व दुसऱ्यावर अन्याय” हे तत्व संवैधानिक नसून समानतेच्या तत्वाला छेद देणारे आहे. मागासवर्गीयामध्ये भेदभाव करणारे आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गेली अनेक वर्षापासून हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला आहे. अनेकदा निवेदने दिले व वेळोवेळी संवैधानिक मार्गाने मोर्चे काढले याचा परिणाम म्हणून विधीडळात अनेकदा या प्रश्नासंदर्भाने बैठकही झाल्या मात्र हा प्रश्न मार्गी लागला नाही. सन. २००९ मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. अशोक चव्हाण यांनी एक महिन्याच्या आत.. OBC ना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अनेक वर्षे लोटूनही.. ओबीसींना न्याय मिळाला नाही. मा. स्वरूपसिंह नाईक यांच्या शिफारसी मान्य करून मागासवर्गीयामध्ये भेदभाव करणाऱ्या बाबीकडे लक्ष देऊन ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये १९९६ आरक्षण देण्यात यावे. अन्यथा ओबीसी कर्मचान्यांमध्ये तीव्र असंतोष उफाळून येईल. यास्तव, वरील मागणीचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करून ओबीसी कर्मचाऱ्यांना न्याय दयावा.

अशी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघ ब्रम्हपूरी आज दिनांक ३१/०५/२०२१ला ओबीसी कर्मचारी याना पदोन्नती मध्ये आरक्षण मिळण्यासाठी मा. तहसिदार साहेब ब्रम्हपूरी मार्फत मा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म. रा. मा. अजित पवार उपमुख्यमंत्री म. रा. मा. छगन भुजबळ अन्न पुरवठा मंत्री म. रा., मा. विजय वडेट्टीवार इतर मागास बहुजन कल्याण मंत्री म. रा., मा. वर्षा गायकवाड शालेय शिक्षण मंत्री म. रा. निवेदन देताना श्री रवि पिलारे तालुका अध्यक्ष ओबीसी, श्री टिकेश्वर शिवणकर सरचिटणिस, श्री दिलीप बावणकर कार्याध्यक्ष श्री नामदेव गहाणे कोषाध्यक्ष, श्री भाऊराव कावळे, श्री रामकृष्ण चौधरी, श्री सुरेश बुराडे, श्री विजय शास्त्रकार श्री केवळ मैंद,
उपस्थित होते.