रुपेश वानखडे यांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याचा केला संकल्प

36

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.3जून):-रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि आता तर कोरोणा (कोविड-१९)या आजाराचे संकट गेल्या मागील एका वर्षांपासून देशावर आणि राज्यावर असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे .अशावेळी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा यवतमाळचे सरचिटणीस ,डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या सोबत विविध कार्यक्रमात सहभाग , महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य सहकार्यवाह ,एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट वक्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समतादुत या पदावर समाज कल्याण यवतमाळ येथे कार्यरत असलेले रुपेश वानखडे यांनी दिनांक ३/६/२०११ रोजी एका गरजूला रक्ताची खूप आवश्यकता होती.

तेव्हा त्यांनी कसलाही विचार न करता त्या गरजुवंत व्यक्तीला रक्तदान दिले .तो दिवस म्हणजे रुपेश वानखडे यांचा जन्मदिवस तेव्हापासून त्यांनी असा संकल्प केला. की आपल्या रक्तदानामुळे एक जीव वाचला तेव्हा आपण आपल्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त रक्तदान करुन वाढदिवस साजरा करायचा तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत आपला संकल्प अखंडपणे चालू ठेवत आहेत. हा संकल्प ते आपले स्वास्थ जोपर्यंत निरोगी राहील तोपर्यंत रक्तदान करणार आहेत .तसेच त्यांनी असे आवाहन केले की या कोरोना विषाणू महामारीमुळे संपूर्ण देश संकटात आहे .तेव्हा आपण आपल्या परीने इतरांना जे काही सहकार्य करता येईल ते करून आपला संकल्प पूर्ण करावा .