अभ्यास आणि प्रयत्नाने उज्ज्वल यश मिळते-अल्ताफहुसेन मुल्ला

  75

   

  कराड : () “विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच मेहनत, प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते. महाविद्यालयात शिक्षण घेताना अभ्यासाबरोबर कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, संगीत तसेच राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी मध्ये सहभाग घ्यावा. आपले व्यक्तिमत्व सुधारते. आपण पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरावीत म्हणून अपार कष्ट करा. जे का रंजले गांजले त्यांसी करूया आपुले हे ब्रीद घेऊन शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करीत असलेल्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड मध्ये गुणवंत, यशवंत विद्यार्थ्याचा यथोचित गुणगौरव करून आर्थिक साहाय्य केले जाते.” असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्था कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे महाविद्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
  या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री अरुण पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड उच्च शिक्षण मंडळ) हे होते.
  शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादी, एनसीसी, एनएसएस. युवा महोत्सव, विविध प्रकारातील खेळ, विविध निबंध स्पर्धा तसेच वर्गात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत, यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मा. श्री अल्ताफहुसेन मुल्ला (जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) तसेच मा. श्री अरुण पाटील (काका) (विश्वस्त व सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, कराड) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
  सदर कार्यक्रमामध्ये मान्यवरांचे स्वागत प्रभारी प्राचार्य मा. प्रा. (डॉ.) श्रीमती एस. आर. सरोदे यांनी केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डॉ. आर. आर. थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती आर. एस. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती टी. टी. सरकाळे यांनी केले.
  या समारंभास महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.