पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते दिव्यांगासाठी एकदिशीय कोविड लसीकरण मोहिमेचा होणार शुभारंभ

36

🔸प्रथमच जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी विशेष एकदिवसीय कोविड लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा- डॉ.संतोष मुंडे

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.4जून):- शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते हस्ते
बीड जिल्ह्यातील प्रथमच दिव्यांगांसाठी विशेष एकदिवसीय कोविड लसीकरण मोहीम (शिबीर) दि.5 जुन 2021 रोजी शुभारंभ होणार असून दिव्यांग लाभार्थ्यांनी या लसीकरण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष, अपंग संघटना महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ.संतोष मुंडे यांनी केले आहे.राज्यातील व जिल्ह्यातील दिव्यांग नागरिकांकसाठी किमान एक दिवस स्वतंत्र लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडेंनी मंत्री धंनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना रविवारी (दि.२३ मे) रोजी दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत दि.5 जून रोजी प्रथमच जिल्ह्यात विशेष एकदिवसीय लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामुळे लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लसीकरणास राज्यातील व जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गर्दीत दिव्यांग नागरीकांना लस घेण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना लस मिळत नाही. दिव्यांग बांधवांची शारीरिक क्षमता अगोदरच कमी असते. त्यांना कोरोनाचा लवकर संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे त्यांना लसीकरणाची गरज आहे.

याचा विचार करुन पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्यात दिव्यांगासाठी लसीकरण मोहीम राबवावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते. याच निवेदनाची दखल घेत जिल्ह्यातील दिव्यांगासाठी एकदिवसीय कौविड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे होणार आहे.

दिव्यांग बांधवांच्या कोविड – १९च्या लसीकरणासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असून या दिवशी फक्त ४५ वर्षावरील दिव्यांग बांधवाचे लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार असुन त्यासाठी त्यांना कुठल्याही ऑनलाईन नोंदणीची गरज नाही. तसेच या कार्यक्रमास दिव्यांग बांधवांनी सोबत आधार कार्ड व दिव्यांग आँनलाईन प्रमाणपत्र सोबत आणावे, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर व लसीकरण केंद्रावर एकाच वेळी होणार आहे. त्यामुळे आपल्या जवळील केंद्रावर जाऊन जिल्ह्यातील ४५ वर्षावरील दिव्यांगांनी या विशेष लसीकरण मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.