भारताचा उल्लेख हिंदुस्तान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे – दादासाहेब शेळके(प्रमुख भिम टायगर सेना)

30

✒️उमरखेड तालुका प्रतिनिधी(सिध्दार्थ दिवेकर)

यवतमाळ(दि.5जून):- केंद्रात भाजप सरकार आल्यापासून हिंदुत्ववाद्यांना वाटते की, भारत ह्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राला 1) हिंदू राष्ट्र करणे 2) देशाचं नाव हिंदुस्तान ठेवणे 3) संविधान बदलणे अर्थात मनुस्मृती लागू करणे सोपे होणार आहे.
कारण ऑगस्ट 2014 ला विश्व हिंदू परिषदेचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले देशाचे नाव “हिंदुस्तान” असून येथे राहणारे सर्व हिंदू आहेत. त्यासाठी त्याने आधार दिला जसे अमेरिकेत राहणारे अमेरिकन,जर्मनीत राहणारे जर्मन व जपान मध्ये राहणारे जपानी तसेच भारतात राहणारे भारतीय म्हणण्याऐवजी त्यांच्या हिंदू मानसिकतेमुळे हिंदुस्थानात राहणारे हिंदू असे त्यांनी म्हटले होते.

नाहीतरी 1969 मध्ये श्री गोळवळकर यांनी दैनिक नवाकाळ ला दिलेल्या मुलाखतीत चातुर्वर्ण हे ईश्वर निर्मित आहे म्हणून त्यांची पुनर्स्थापना व्हायला हवी याचा अर्थ आपल्या भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवून त्या राष्ट्राचे संविधान मनुस्मृति लागू करावी असे होते.
30 मे 2020 रोजी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एस. ये. बोबडे यांच्या खंडपीठात एक याचिका दाखल झाली होती. त्यात म्हटले होते भारताचे संविधान भाग 1 “संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र” अनुच्छेद 1 नुसार आपल्या देशाचे नाव “इंडिया” अर्थात “भारत” आहे.

भारताचे संविधान भाग 20 “संविधानाची सुधारणा” आर्टिकल 368 नुसार आर्टिकल 1 मध्ये सुधारणा करून त्यातील इंडिया शब्द वगळून त्याऐवजी हिंदुस्तान हा शब्द टाकण्यात यावा.
व देशाचे नाव भारत किंवा हिंदुस्तान ठेवण्यात यावे असे याचिकेत म्हटले होते.पुढे या याचिकेवर निर्णय देताना भारतीय संविधानानुसार आपल्या देशाचे नाव “भारत”असल्यामुळे आपली याचिका फेटाळण्यात येत आहे. असे सुप्रीम कोर्टाने आपल्या जजमेंट मध्ये म्हटले होते. तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर भारताला 1) ब्रह्मावर्त 2) आर्यावत 3) भारत 4) इंडिया 5) हिंदुस्तान 6) जम्बुदीप 7 ) भारतवर्ष इत्यादी नावाने आपल्या देशाला ओळखले जात होते.

जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाचं भारतीय संविधान तयार होत असताना 18 सप्टेंबर 1948 मध्ये देशाचे नाव ठेवताना संविधान सभेत आर्टिकल 1 वर खूप चर्चा झाली व शेवटी चर्चेअंती सर्वानुमते देशाचे नाव ठेवण्यासाठी दोन पर्याय उरले 1) भारत आणि 2 ) हिंदुस्थान या शब्दावर संविधान सभेच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला या देशाचं नाव हिंदुस्तान ठेवले तर इतर धर्मीय लोक आपल्या देशात राहतात त्यांच्या मना मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होईल. कारण हिंदुस्तान हा शब्द धर्मवाचक होता. हिंदुस्तान या शब्दाचा शब्दशः अर्थ जिथे हिंदू राहतात किंवा हिंदू चे राहण्याचे ठिकाण मग प्रश्न असा निर्माण होतो इतर धर्मीय यांचे राहण्याचे ठिकाण कोणते ? कारण जर्मनी, इंग्लंड, अमेरिका या देशात 90 टक्के लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत म्हणून त्या देशाचे नाव ख्रिश्चन धर्मावर आधारित नाही.

चीन, श्रीलंका,थायलंड व जपान .या देशात 90 टक्के लोक बौद्ध राहतात म्हणून त्या देशाचे नाव बौद्ध धर्मावर आधारीत नाही. उलट जे जे देश धर्मावर आधारित आहेत ते देश अधोगतीला गेलेले आहेत उदा. पाकिस्तान हा धर्मावर आधारित असलेल्या देश असून त्याचे दोन तुकडे होऊन बांगलादेश देश निर्माण झालेला आहे. पण स्वातंत्र्याच्या जवळपास 75 व्या वर्षापर्यंत आपला भारत देश भारतीय संविधानामुळे एकसंघ आहे. म्हणून शेवटी सर्वानुमते संविधान सभेत ठरले देशाचे नाव संविधानानुसार “भारत” अर्थात “इंडिया” (INDIA) राहील व आपला देश हा धर्मनिरपेक्ष राहील धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ भारताचा कोणताही राज्य धर्म नाही भारत हे राष्ट्र एका धर्माला अनुकूल व दुसऱ्या धर्माला प्रतिकूल असे कोणतेही कृत्य करणार नाही. उलट भारताचे संविधानातील “उद्देशिका” मध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता आपले भारतीय संविधान सर्व धर्मातील नागरिकाला सारखीच देते.

भारताचे संविधान भाग तीन मूलभूत हक्क आर्टिकल 14 कायद्या पुढे सर्वच जाती-धर्माचे लोक समान असतील व आर्टिकल 15 नुसार धर्म,वंश,जात,लिंग,व जन्मस्थान यावरून भेदभाव करता येणार नाही. व प्रत्येक धर्मातील लोकांना आर्टिकल 19 नुसार प्रत्येकाला 1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य 2) शांततेने व विना शस्त्रक्रिया एकत्र जमण्याचा अधिकार 3) भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे फिरण्याचा अधिकार 4 )भारताच्या राज्य क्षेत्रातील कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार ई. सर्व धर्मीयांना इथे सारखाच आहे. तर आर्टिकल 25 नुसार प्रत्येक नागरिकांना धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. भारताचे संविधान भाग चार “राज्यांची मार्गदर्शक तत्त्वे” आर्टिकल 39 नुसार सर्वच धर्मातील लोकांना उपजीविकेचे पुरेसे साधण मिळण्याचा हक्क स्त्री पुरुष यांना सारखा दिलेला आहे. तसेच सर्व धर्मातील स्त्री व पुरुषांना या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन दिलेल आहे. भारताचे संविधान भाग 15 “निवडणुका” मध्ये आर्टिकल 325, 326 मध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना मतदानाचा अधिकार सारखाच दिलेला आहे.

जगात आदर्श असलेले असे आपले धर्मनिरपेक्ष सविधाना नुसार या देशाचे नाव “भारत” असताना इतर धर्मीयांमध्ये दहशत पसरविण्यासाठी या देशाचा उल्लेख हिंदुस्तान करणे हे राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाणारे आहे उद्या जर एखाद्या मुसलमानाने या देशाचा उल्लेख मुस्लिम स्थान केला तर, जर एखाद्या बौद्ध बांधवांनी या देशाचा उल्लेख बुद्धस्थान केला तर जर एखाद्या शीख बांधवांनी या देशाचा उल्लेख शिखस्थान केला तर हे योग्य राहील का? तर हे अजिबात योग्य नाही तर शंभर टक्के चुकीच आहे. या देशाची राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंडता जोपासयाची असेल या देशात प्रत्येक धर्मातील लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करायचा असेल प्रत्येक धर्मातील नागरिकांनी आपल्या देशाचा उल्लेख संविधानानुसार भारतच करावा.
जर कोणी आपल्या देशाचा उल्लेख हिंदुस्तान वैगरे करत असेल आशा वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसा संसदेत कायदा करावा असे भीम टायगर सेनेचे स्पष्ट मत आहे भविष्यात हा विषय घेऊन “भिम टायगर सेना” आंदोलन करेल..!
असे मत दादासाहेब शेळके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सविस्तरपणे व्यक्त केले.

जय भिम, जय सर्व महापुरुष ,जय संविधान, जय भारत