पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

123

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.6जून):-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड मुंबई ,ग्रीन सेवर बायोफ्युएल प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट व ऍग्रो गेन क्रॉप्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या सयुंक्त विद्यमाने हिंगणघाट तालुक्यातील वडणेर येथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला व सोबतच ऍग्रो गेन क्रॉप फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा उदघाटन संपन्न झाले,यावेळी शेकापूर बाई येथे होणाऱ्या बायो सी एन जी प्रकल्पातून हिंगणघाट तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा कसा होणार.

शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम कसा होणार,तालुक्यात रोजगार निर्मिती, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी वडनेर येथील सरपंच विनोद वानखेडे , शेकापुर बाई येथील सरपंच देविदास पाटील ,वेणी येथील सरपंच दुरतकर ,एमसीएल कंपनीचे संजय पिंपळकर ,अल्लीपुर येथील सेंद्रीय खत मार्गदर्शक ढगे ,कंपनीचे डायरेक्टर लोकेश राडे ,संतोष राईकवार ,विलास गलांडे ,मिनाक्षी राईकवार व हिंगणघाट तालुक्यातील सर्व व्हिलेज प्रोजेक्ट धारक व शेतकरी सभासद उपस्थित होते.
प्रभाकर कोळसे