कोरोना रुग्ण सेवा समितीची गावागावात जनजागृती मोहीम

83

✒️गेवराई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गेवराई(दि.6जून):-कोरोना या रोगाविषयीचे समज गैरसमज दुर करण्यासाठी,तसेच या रोगाविषयी नागरिकांच्या मनात असलेली भिती घालवण्यासाठी कोरोना रुग्ण सेवा समितीने आज धोंडराई कोमलवाडी व राजपींप्री या गावात भेटी दिल्याची माहिती समीतीच्या सदस्यांनी दिली.कोरोना होऊच नये किंवा झालाच तर काय खबरदारी घ्यावी याविषयीची ओरोग्यविषयक माहिती डाॅ.आनिल दाभाडे यांनी दिली व कोरोना संबंधित काहीही अडचण आली तर 24×7 कधीही फोन करा असे आवाहन समीतीचे सदस्य शिरीष भोसले यांनी केले.

जनजागृती कार्यक्रम संपल्यानंतर डाॅ.आनिल दाभाडे यांनी कोरोना बरा झालेल्या पंचवीस लोकांच्या मोफत बी.पी,शुगर,व ऑक्सिजन च्या चाचण्या करुन त्यांना रीपोर्ट सह मार्गदर्शन केले.तसेच समीतीच्या सर्व सदस्यांनी 18 वर्षा खालील मुला मुलीसाठी रोग प्रतीकार शक्ती वाढण्यासाठी च्या गोळ्यांचे वाटप केले.त्यानंतर समितीने धोंडराई येथील गावपुढाकारातुन सुरु झालेल्या कोव्हीड सेंटर ला भेट देऊन सेंटर सुरु केल्याबद्दल मेघारे सरांचे व तेथील सेंटर चे संचालक भागवत टेकाळेंचे ते करत असलेल्या अनमोल कामाबद्दल समीती तर्फे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

समितीचे कार्य बघुन तीन्ही गावकरी मंडळीने समीतीचे पुष्पगुच्छ दाऊन आभार मानले व कार्यक्रम संपला.यावेळी संजय काळे,डाॅ.आनिल दाभाडे,पत्रकार अमोल कापसे,करण दाभाडे,रोहन दाभाडे,हे उपस्थित असल्याची माहिती समितीचे सदस्य शिरीष भोसले यांनी दिली