26 जुन रोजी राज्यभर मागासवर्गीय संघटना व समाजाच्या वतीने प्रचंड मोर्चे

33

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.8जून):-आरक्षण हक्क कृती समितीच्या कोअर कमिटी व राज्य प्रतिनिधीच्या राज्यस्तरीय दि. ५ व ६ जुन रोजीच्या ऑनलाईन बैठकीत सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर दि २६ जून २०२१ रोजी आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर व मुंबईत मंत्रालयावर प्रचंड मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोर्चाची तयारी व आढाव्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीचे कोअर कमिटी सदस्य तथा राज्य निमंत्रक व मागासवर्गीय संघटनांचे राज्य प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुढीलप्रमाणे प्रादेशिक बैठकांचे आयोजन करण्यात आहे.

शनिवारी दि १२ जून २०२१ – अमरावती येथे अमरावती (अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा जिल्हा) प्रादेशिक बैठक व पुणे येथे पुणे(पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा) प्रादेशिक बैठक
रविवारी दि १३ जून २०२१ रोजी नागपूर येथे नागपूर (नागपूर,वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा) प्रादेशिक बैठक व नाशिक येथे नाशिक (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्हा)प्रादेशिक बैठक
रविवारी २० जुन रोजी औरंगाबाद येथे मराठवाडा (औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा) प्रादेशिक बैठक व मुंबई येथे कोकण (मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा) प्रादेशिक बैठक .
नागपूर, अमरावती व औरंगाबाद येथील बैठकीत जे.एस. पाटील, ई.झेड. खोब्रागडे , अरुण गाडे, एन बी जारोंडे, डॉ नितीन कोळी, संजीवन गायकवाड, धर्मपाल ताकसांडे, सुभाष मेश्राम, अनिलकुमार ढोले ,फरेन्द्र कुतीरकर, विठ्लराव मरापे, अश्विनकुमार मेश्राम, एम एम अत्राम इत्यादीं उपस्थित राहाणार आहेत आणि पुणे, नाशिक, मुंबई येथील मेळाव्यात हरीभाऊ राठोड (माजी खासदार) सुनिल निरभवणे, एस के भंडारे, आत्माराम पाखरे, संजय कांबळे बापेरकर, सिद्धार्थ कांबळे , शरद कांबळे,डॉ. बबन जोगदंड , सागर तायडे, संजय खामकर ,मिलिंद बागुल, संजय घोडके,शामराव जवंजाळ, यशवंत मलये इत्यादी उपस्थित राहणार आहेत.

आरक्षण हक्क कृती समितीच्यावतीने जिल्हा आंदोलन समिती तयार करण्यात येणार असुन त्यांच्या मार्फत जिल्हा, तालुका, शहर, गाव पातळीवर ऑनलाईन अथवा शक्य असेल तेथे कोरोना /लॉकडाऊनचे नियम पाळून प्रत्यक्ष बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मोर्चामध्ये सर्व मागासवर्गीय समाज, विद्यार्थी, महिला, कामगार, कर्मचारी, अधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते इत्यादींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.