अखेर पंचायत समिती उपसभापती पदी पंचफुलाबाई खांडेकर यांची बिनविरोध निवड

31
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे):-मो.नं.९४०४६४२४१७.

देगलूर(दि.१०जून):-मागील दोन महिन्यापासून चाललेल्या नाट्यमय घडामोडीला शेवटी यश प्राप्त झाले,व शहापूर गणाच्या सौ.ज्योती जगदीश चिंतलवार यांनी दि.२७ मे २०२१ रोजी आपल्या उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यामुळे या रिक्त जागेवर दि.८ जून रोजी विषेश सभा घेत पंचायत समिती उपसभापती पदी तमलूर गणाच्या सदस्या पंचफुलाबाई किशनराव खांडेकर यांची बिनविरोध नावड करण्यात आले.
यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम पीठासीन अधिकारी तर सहाय्यक राजकूमार मुक्कावार होते.दि.८ जून २०२१ रोज मंगळवार सकाळी दहा वाजता निवड प्रक्रियेला सुरूवात झाली.यावेळी उपसभापती पदासाठी पंचफुलाबाई किशनराव खांडेकर यांचा एकमेव अर्ज दाखल होता.

छाननीनंतर ते वैद्य असल्याने खांडेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे शक्ती कदम यांनी घोषित केले.यावेळी पंचायत समितीचे १० सदस्यापैकी ८ सदस्य उपस्थित होते.यावेळी पं.स.सभापती संजय वलकले,माजी सभापती शिवाजीराव देशमुख,गिरीधर पाटील,संगीता सलवार,कांबळे मुक्ताबाई,सुशिलाबाई किशनराव हंदिखेरे,पुंडलीकराव तालीमकर आदी पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी बिनविरोध निवड होताच फटाक्याच्या आतिषबाजीने जल्लोष करण्यात आले.यावेळी देगलूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,तालुका कॉग्रेस कमेटी अध्यक्ष प्रितमजी देशमुख,माजी जि.प.सभापती माधवराव मिसाळे गुरूजी,बिलोली तालुका कॉग्रेसचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपींपळीकर,जनार्धन बिरादार,बालाजी टेकाळे,डॉ.विजयकुमार धूमाळे,सादीक मरखेलकर आदी उपस्थित होते.