श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतिने जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण

38

✒️खामगाव प्रतिनिधी(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.14जून):-स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतिने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन आज दिं ५/६/२०२१ शनिवार रोजी कोरोना महामारी चे सावट पाहता सोशलडिस्टनसिंग चे नियम पाळत वृक्षारोपण करण्यात आले व मागील वर्षी लावलेल्या वृक्षाचा वाढदिवस करण्यात आला.

यावेळी मंडळाचे जेष्ठ रमेश काका सरोदे, योग शिक्षक गोविंदभाऊ कडवकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा, लालाजी सांगळे, दिलीप भाऊ झापर्डे,अरूण भाऊ कडवकर , विनोद भाऊ सुकाळे, महेश बोडखे,सचिनभाऊ मकवाना, विजय झिने,व परिसरातील नागरीकांची उपस्थिती होती.अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतीने देण्यात आली आहे