वंचित बहुजन महिला आघाडीमध्ये भाजप महिला पदाधिकारी यांचा प्रवेश

33

✒️कल्याण(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कल्याण(दि.१७जून):-रोजी कल्याण येथील बल्याणी येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेक महिला व पुरुषाचा प्रवेश करण्यात आला.वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे व कल्याण प.चे अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मराठा, मुस्लिम,आग्री, कोळी व उत्तर भारतीय समाजातील महिला व पुरुषाचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

प्रामुख्याने भाजप महिला पदाधिकारी कमलताई पाटील व‌ त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन महिला आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. या‌ प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे , कल्याण तालुका अध्यक्ष मनिषाताई जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जानु मानकर , जिल्हा प्रवक्ता बी.बी प्रधान , जिल्हा सचिव विश्वास सदाफुले, ठाणे जिल्हा समन्वयक दीपक खांबेकर , टिटवाळा अध्यक्ष शेहनाज सय्यद , मोहने महासचिव लीना पाटोळे ,मोहने शहर प्रमुख किरण शेंडगे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.