ढाणकी येथे कायमस्वरूपी नायब तहसीलदार कार्यालय सुरू करा

26

🔹वंचित बहुजन आघाडी ची मागणी

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.18जून):- ढाणकी व परिसरातील तीस ते चाळीस गावातील नागरिकांना तहसीलच्या छोट्या छोट्या कामासाठी उमरखेड येथे नेहमीच जावे लागते.बंदी भागातील नागरिकांना उमरखेड ला येण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ढाणकी येथेच कायमस्वरूपी नायब तहसीलदार कार्यालय सुरू करावे अश्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी ने उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे.

ढाणकी शहरात मोठी बाजारपेठ असून लगतचे 30 ते 40 गावे ढाणकी ला जुळलेले आहेत. यामुळे बंदी भागातील नागरिक खरेदी साठी उमरखेड शहरात न जाता ढाणकी इथेच येतात. कारण जवळपास सर्व गोष्टी ढाणकी ला उपलब्ध असतात यामुळे नागरिकांची परवड देखील थांबते परंतु शासकीय कामासाठी त्यांना चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर कापून उमरखेड येथे यावेच लागते.

जर ढाणकी येथेच कायमस्वरूपी नायब तहसील कार्यालय झाल्यास बंदी भागातील नागरिकांची व तालुक्याच्या शेवटच्या कोपऱ्यात असणाऱ्या गावांच्या नागरिकांची परवड थांबेल आणि त्रास कमी होऊन आर्थिक नुकसान सुद्धा होणार नाही. यामुळे ढाणकी तालुका होईपर्यंत नायब तहसील कार्यालय सुरु करावे असे निवेदनात म्हटले आहे.

कॉलम :- या पूर्वी 2006 मध्ये तत्कालीन तहसीलदार शाम झळके यांनी ढाणकी व परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता ढाणकी येथे सोमवार आणि गुरुवार या आठवड्यातून दोन दिवस नायब तहसील कार्यालय सुरु झाले होते. त्यामुळे महसूल कामासाठी बंदीभागातून उमरखेडला जाण्याचा त्रास कमी झाला होता.