निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने कामाला लागा- धनंजय गायकवाड

36

🔸पुसद येथे वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.18जून):-आगामी जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोर्चेबांधणी करण्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच स्थानिय शासकीय विश्रामगृह पुसद येथे संपन्न झाली.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी छोट्या छोट्या वंचित समूहाला सत्तेत वाटा मिळवून देण्यासाठी संपूर्ण बहुजनांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि सामान्य कार्यकर्त्याला राजकीय सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला .

आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्तेत वाटा मिळावा यादृष्टीने सर्वांनी कामाला लागावे. असे आवाहन जिल्हा महासचिव डी .के .दामोधर यांनी केले .

पक्ष वाढीसाठी सभासद नोंदणी सह गाव तिथे शाखा निर्माण करण्याच्या सूचना कार्याध्यक्ष प्रमोद राऊत यांनी दिल्या.पक्षाच्या ध्येय धोरणाची माहिती सामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी.सभासदाच्या नोंदणीवर भर देण्यात यावी. पक्षाची बांधणी मजबूत करण्याच्यासंबधीचे नियोजन, या बाबींसह कार्यकर्त्यानी जनतेच्या प्रत्येक प्रश्नाकडे वाचा फोडण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वतीने आंदोलने,मोर्चे इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात यावेत असे जिल्हा अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितले.

यावेळी येणाऱ्या काळात पक्ष मजबुती व वाढीव संघटनवर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष ,शहराध्यक्षासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्येने उपस्थित होती.

प्रमुख पाहुने म्हणुन जिल्हामहासचिव प्रशांत विणकरे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव गायकवाड ,ऊकेशवर मेश्राम, विजय लहाने ,लक्ष्मण वानखेडे हे होते कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व शहराध्यक्ष शेख.मुक्तार शेख.निजाम यांनी केले.यावेळी दीपक पदमे,प्रसाद खंदारे,स्वप्नील पाईकराव, विपुल भवरे,धीरज कांबळे,सचिन सूर्यवंशी, मौलाना सय्यद हुसेन, मौलाना शेख मदार ,शे.असिफ,प्रकाश खिलारे,अमोल पाईकराव, विक्रात डाके,शे.रफिक,शे.तोफिक, शे.सलमान इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा.जनार्धन गजभिये यांनी केले .तर आभार प्रदर्शन राजकुमार तालीकुटे जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा यांनी केले.