महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी महावितरण कार्यालयास कारवाई थांबविण्याचा दिला इशारा

22

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.18जून):- पिंपळगाव येथे महावितरणच्या वतीने वीज बिलांची सक्तीने वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई त्वरित बंद करावी यासाठी निफाड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयास कारवाई थांबविण्याचा इशारा दिला.

लॉकडाऊनच्या काळामध्ये ग्रामस्थांना रोजगार नसल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले आहे. या काळामधील वीज बिले थकीत आहेत. ही बिले माफ व्हावीत यासाठी मागणी केली आहे. मात्र पिंपळगाव बसवंत येथील महावितरणमार्फत अशा थकीत बिलांची वसुली सक्तीने सुरू असून वीज पुरवठाही खंडित केला जात आहे. ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास येताच त्यांनी महावितरणच्या कार्यालयात भेट देऊन ही कारवाई थांबविण्य‍ाची मागणी केली. असे न झाल्यास पुढील संघर्षाला सर्वस्वी महावितरण जबाबदार असेल, अशा स्पष्ट शब्दांत निफाड तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने इशारा देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संजय मोरे तालुका अध्यक्ष शैलेश दादा शेलार उपतालुका अध्यक्ष सतीश पाटीलशहराध्यक्ष राजेंद्र भवर मनसे सरचिटणीस निलेश किशोर सोनवणे योगेश पाटील जयेश ढिकले उपशहर अध्यक्ष निलेश सोनवणे पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.