महाराष्ट्रातील २७७५ निसर्ग प्रेमी व्यक्तींना “पर्यावरण गौरव प्रमाणपत्र ” देवून राजेंद्र लाड यांचा वाढदिवस साजरा

60

🔹वाढदिवसानिमित्त गटशिक्षणाधिकारी कार्यालयात व आष्टी नं.१ शाळेत वृक्षारोपण

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.18जून):- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे। आळविती।।येणे सुख रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष। अंगी येत।। असे संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील आदर्श निसर्ग प्रेमी व्यक्तींना “पर्यावरण गौरव प्रमाणपत्र” व्हाॕटसअप च्या माध्यमातून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी वाढदिवसानिमित्त २७७५ निसर्ग प्रेमी व्यक्तींना गौरव प्रमाणपत्र देवून एक आगळा – वेगळा उपक्रम राज्यभर राबवून वाढदिवस साजरा केला.

आपल्या भारत देशावर कोसळलेल्या कोरोना विषाणूच्या भयंकर आजारावर मात करीत असतांना अनेकांना आँक्सीजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली.नव्हे नव्हे तर काही जण ऑक्सीजन न मिळाल्यामुळे आपल्याला सोडून गेले.तेंव्हा खऱ्याअर्थाने आँक्सीजन ची कमतरता पूर्ण करावयाची झाल्यास वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.म्हणून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून एक महान कार्य करुन “फुल ना फुलाची” पाकळी याप्रमाणे पर्यावरणासाठी आदर्श काम केलेल्या व्यक्तींना शाबासकीची थाप द्यावी व वृक्षारोपण काळाची गरज ओळखून झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करणे याच एका उद्दात हेतूने राजेंद्र लाड यांनी निस्वार्थपणे पर्यावरण गौरव प्रमाणपत्र देण्याचे काम केलेले आहे.

राजेंद्र लाड यांनी १५ जून २०२१ रोजी वयाची ४५ वर्षे पूर्ण केली असल्यामुळे त्यांनी २७७५ आदर्श निसर्ग प्रेमी व्यक्तींना गौरव प्रमाणपत्र देण्याचा संकल्प करुन तो त्यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना जिल्हा शाखा बीड च्या माध्यमातून दि.५ जून ते १४ जून २०२१ या दहा दिवसाचे पर्यावरण अभियान राबवून पूर्ण केलेला आहे.तसेच राजेंद्र लाड यांनी दि.१५ जून २०२१ रोजी वाढदिवसानिमित्त गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती आष्टी येथे गटविकासअधिकारी सुधाकर मुंडे,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण केले.

यावेळी शापोआ विभागप्रमुख शिवाजी आव्हाड,ग्रामविकास अधिकारी तथा ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ लोंढे,विषयतज्ञ राजाभाऊ भडके,नितीन सोनटक्के उपस्थित होते.तसेच जि.प.कें.प्रा.शा.आष्टी नं.१ येथे केंद्रीय मुख्याध्यापक सुरेश पवार,आदर्श शिक्षक रविंद्र भोसले व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले.महाराष्ट्र राज्यातील आदर्श निसर्ग प्रेमी व्यक्तींनी झाडे लावा…

पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळवा या अभियांनातर्गत झाडे लावतानांची फोटो व्हाॕटसअपच्या माध्यमातून मागवून महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड च्या वतीने पर्यावरण गौरव प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला.स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा मोठेपणा यासाठी हे अभियान राबविले गेलेले नसून वृक्षारोपण काळाची गरज समजून हे अभियान राबविण्यात आलेले आहे.असे शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.शैक्षणिक,सामाजिक,राष्ट्रीय कार्यात स्वतः ला वाहून घेणाऱ्या आदर्श शिक्षक राजेंद्र लाड यांच्या “झाडे लावा…पर्यावरण गौरव प्रमाणपत्र मिळवा” या आगळ्या – वेगळ्या अभियानाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे या अभियानासाठी कौतुक होत आहे.