🔹मा.आ.भीमसेन धोंडे यांच्यासह भाजपाच्या दहा आंदोलकांना अटक

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.26जून):-ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे.हे आरक्षण पुन्हा मिळावे,यासाठी भाजपाच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आ.भीमसेन धोंडे यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव येथे हजारोच्या संख्येने शनिवार दि.२६जून रोजी चक्काजाम आंदोलन येथील बीड – नगर – कल्याण रोडवरील शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.आंदोलना नंतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केले.
सध्याचे सरकार नाकर्ते असून,गेल्यावेळी भाजप सरकारने घेतलेले चांगले निर्णय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे.

मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत आहे.आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.केंद्राने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मात्र राज्य सरकार स्वतःकडे घेत आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसीचे आरक्षण धोक्यात आले आहे.पदोन्नतीमधील ओबीसीचे आरक्षणही संपवण्यात आले आहे.त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे.सरकारने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे.ओबीसी समाजाच्या सवलतींबाबत ओबीसी समाजाची जनगणना करावी.पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवावे.

या मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विरोध केला जाईल.तसेच आष्टी येथे ऑगस्ट महिन्यात ओबीसी समाजाचा भव्य दिव्य असा मोर्चा काढणार आहे या मोर्चाची दखल सरकार घेईलच यांची नोंद महाराष्ट्रात होईल असे आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी दिला.
यावेळी भाजपा भटके विमुक्त जाती व अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष वाल्मिक निकाळजे,जि.प.सदस्य रामराव खेडकर,सुरेश माळी,जेष्ठ नेते बबनराव झांबरे,युवा नेते अजय दादा धोंडे,तालुकाध्यक्ष हनुमंत थोरवे,अमोल तरटे,शंकर देशमुख,पं.स.सदस्य आदिनाथ सानप,प्रा.दादासाहेब झांजे,रघुनाथ शिंदे,माजी सरपंच संतोष चव्हाण,अमोल चौधरी,अभयराजे धोंडे,मैनुद्दीन शेख,दिलीपराव काळे,अशोक साळवे,सतिष झगडे,सरपंच शितलताई चौधरी,सावता ससाणे,दिपक कर्डीले,शैलजा गर्जे,सुरेखा केरुळकर,दैवशाला शिरोळे,तात्यासाहेब कदम,संदिप नागरगोजे,बंटी गायकवाड,सुनिल सुर्यवंशी,संजय धायगुडे,अजिनाथ बेल्हेकर,युवराज वायभासे,सदाभाऊ दिंडे,युवराज खटके,जाकीर कुरेशी,आकील सय्यद,किशोर खोले,संजय शिरसाठ आदी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
———————————————-
मा.आ.भीमसेन धोंडे यांना अटक व सुटका
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी धामणगाव येथे चक्का जाम आंदोलन झाल्यानंतर मा.आ.भीमसेन धोंडे यांच्यासह दहा आंदोलनकर्ते यांना अटक करून अभोरा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले व नोटीस देऊन सोडविण्यात आले. 

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED