🔸प्रवेशद्वारासाठी ग्रामपंचायतीचा लाख रुपये खर्च व्यर्थ जाईल का?

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.26जून):-ब्रह्मपुरी -आरमोरी राज्य महामार्गालगत रण मोचन फाट्याजवळील बाहेरून गावात येणाऱ्या पाहुणे मंडळी यांच्या स्वागतासाठी व केवळ रनमोचन गावाची प्रतिमा उंच स्तरावर दाखवण्यासाठी ग्रामपंचायत तर्फे गावातील सराळातील बाभळीच्या झाडाचे विक्री करून खेड खंडोबा करीत हे मुख्य प्रवेशद्वार ग्रामपंचायतीतर्फे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आले.मात्र अजून पर्यंत हे मुख्य प्रवेशद्वार आपल्या साज शृंगाराविना नटण्यासाठी प्रतीक्षेत असली तरी केवळ शोभेची वस्तू म्हणून तर उभी राहणार नाही ना! असा प्रश्न ?आता गावकरी विचारू लागले आहेत.

सन 2019 -20 मध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाला सुरुवात करण्यात आली यासाठी ग्रामपंचायत तर्फे काही राजकीय पुढार्‍यांना कंत्राट देऊन यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र अजून पर्यंत गेल्या दोन वर्षापासून हे मुख्य प्रवेशद्वार अजूनही विकासाच्या प्रतीक्षेतच आहे.प्रवेशद्वार म्हटलं की साजशृंगार आल्याशिवाय तिला महत्त्व प्राप्त होत नाही त्यातच गावातील मुख्य प्रवेशद्वारा मुळे गावाची शोभा वाढवण्यासाठी अनन्य साधारण महत्वाचा भाग म्हणून गावाच्या विकासाचा दृष्टिकोन समोर येतो.

परंतु केवळ ही मुख्य प्रवेश द्वार पांढरा हत्ती म्हणून जर उभी राहात असेल यामध्ये ग्रामपंचायतीने कंत्राटदारा मार्फतीने केलेला लाखो रुपये खर्च पाण्यात वाया जात असेल तर मात्र गावकरी जनता ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे त्यावेळचे स्वतःला राजकीय पुढारी समजणारे तत्कालीन पदाधिकारी यांना आता मात्र जनता प्रश्न विचारत असून ज्यांना पाणी मुरवायची सवय लागली तर समोर सत्तेत येणारे दुसरे ही राजकीय पुढारी व पदाधिकारी वाहत्त्या गंगेत हात धुऊन टाकतील एवढे मात्र निश्चित!

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED