लोकसहभागातुन उभारण्यात येणाऱ्या पोलिस चौकी चे काम अंतिम टप्प्यात- सपोनि आदित्य लोणीकर यांच्या पुढाकाराने केले ‌‌५० झाडाचे वृक्ष रोपन

32
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४३४१७

देगलूर(दि.२७जून):-मरखेल ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांचा पुढाकार व लोकसहभागातून हणेगाव येथील निजाम कालीन पोलिस चौकी ची नवीन इमारत उभारण्यात येत असून दिनांक १४मे २०२१ रोजी विविध मान्यवर व मरखेल ठाण्याचे पोलिस अधिकारी यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात आले.
देगलूर तालुक्यातील हणेगाव येथे निजामाच्या काळापासून अस्तित्वात असलेली परंतु पूर्णतः मोडकळीस आलेली पोलिस चौकीची इमारत अखेर मरखेल ठाण्याचे कर्तबगार पोलिस अधिकारी आदित्य लोणीकर यांनी स्वतः पुढाकार घेवून लोकसहभाग व गावातील परिसरातील दानशूर व्यक्ती च्या मदतीने नविन इमारत बांधण्याचा निश्चय केल्याने अखेर पोलिस चौकीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आले आहे.

व पाहता पाहता बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून देगलूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर यांनी हा काम हाती घेतल्याने अनेकाकडून त्यांचा कौतुक होत आहे.जवळपास शंभर वर्षांपूर्वी पोलिस चौकीची माती दगडाचा बांधकाम होता वर्षानुवर्षे इमारत जीर्ण होत होती परंतु अधून मधून डागडुजी करत अशातच येथील अनेक पोलिस अधिकारी,कर्मचारी आपले जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत होते याच पडक्या पोलिस चौकीत शांतता समितीचे बैठक पार पाडत असे,अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी चौकी पाहून थक्क झाले होते परंतु नाईलाज होता.
शासनाकडून निधी प्राप्त होताच बांधकाम करण्यात येईल असे अनेकांचे विचार होते परंतु आजतागायत निधी प्राप्त झाले नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पास होऊन पोलिस अधिकारी झालेले व मरखेल ठाणे येथे सप्टेंबर 2019 मध्ये रुजू झालेले पोलिस अधिकारी आदित्य लोणीकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत पोलीस चौकी चे काम अंतिम टप्प्यात आणले व पर्यावरण विषयक बांधीलकी जपून पोलीस चौकी मध्ये नवीन वेगवेगळ्या किमान ५० झाडाचे वृक्षारोपण केले. गेल्या एक महिन्यापासून आदित्य लोणीकर यांनी आपल्या पोलीस बांधवासोबत दररोज सकाळी सकाळी दोन तास या पोलीस चौकी मध्ये काम करून समाजातील युवा तरूणांना एक दिशा देण्याचे काम करत आहेत तर या ठिकाणी आदित्य लोणीकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक मरखेल) पोलीस जमादार मोहन कनकवले, चंद्रकांत पांढरे, गजानन जोगपेठे , बिरादार,यंगाले पठाण,घुले आदी जन परीश्रम घेत आहेत